सणवार सुरू झाले की ई कॉमर्स साईट्सवर अनेक प्रोडक्ट्सवर ऑफर सुरू होतात. पितृपक्षात नव्या गोष्टी खरेदी केल्या जात नाहीत. त्यामुळे नवरात्र, दिवाळीचा मुहूर्त साधत अनेकजण शॉपिंग करतात. तुम्हीदेखील यंदा ई कॉमर्स साईटवर अशाप्रकारे स्मार्टफोन विकत घेणार असाल तर सावधान ! कारण सेल्स आणि ऑफर्सच्या काळात ई कॉमर्स साईटवरून वस्तू घेताना अनेकदा फसवणूकीची शक्यता असते.
सेकंड हॅन्ड फोन
अनेक ई कॉमर्स साईट्स रिफर्निश्ड फोन विकतात. हे फोन सेकंड हॅन्ड असतात. अशावेळेस ग्राहकांनी सतर्क राहणं अत्यावश्यक आहे. जर फोन रिफर्निश्ड असेल तर साईटवर त्याची माहिती दिली जाते.
किंमत
ऑनलाईन सेल दरम्यान किंवा इतर वेळेसही ऑनलाईन माध्यमातून वस्तू विकत घेताना त्याच्या किंमती वेगवेगळ्या साईटसवर तपासून पहा. मूळ किंमत आणि डिस्काऊंट किंमत यामधील तफावत पडताळून पहा.
रिव्ह्यू आणि रेटिंग
अमेझॉन आणि फ्लिपकार्ट अशा ई कॉमर्स साईटवरून फोन विकत त्याचा रिव्ह्यू आणि रेटिंग तपासून पहा. अनेकांना लोकांनी लिहलेल्या रिव्ह्यूमधून काही अनपेक्षित गोष्टींचा उलगडा होतो. रिव्ह्यू विश्वसनीय आहे की नाही ओळखल्यानंतरच त्यावर विश्वास ठेवा.
वॉरंटी
स्मार्टफोन विकत घेण्यापूर्वी त्याची वॉरंटी तपासून पाहणं आवश्यक आहे. फोनच्या एक्सेसरीजचीही वॉरंटी तपासून पहा.
ऑफर
अनेकदा ई कॉमर्स वेबसाईट्स काही बॅंका, पे बॅक कार्ड्ससोबत मिळून काही ऑफर्स बनवतात. तुमच्या बॅकेच्या अकाऊंटमध्येही संबंधित काही ऑफर्स आहेत का? हे तपासून पहा.
स्पेसिफिकेशन
ऑनलाईन फोन विकत घेताना त्याची स्पेसिफिकेशन तपासून पहा. ई कॉमर्स वेबसाईट्स अनेकदा चूकीची किंवा सोयिस्कर माहिती ग्राहकांपर्यंत पोहचवतात.
रिफंड आणि रिटर्न
स्मार्टफोन विकत घेण्यापूर्वी रिटर्न आणि रिफंड पॉलिसीदेखील नक्की वाचा. प्रत्येक कंपनीचा रिफंड आणि रिटर्नचा कालावधी वेगवेगळा असतो.
एक्सचेंज
अनेकदा एक्सचेंज करणं फायद्याचं ठरतं. त्यामुळे तुमचा फोन, तुम्ही विकत घेऊ इच्छिणारा नवा फोन यामधील ऑफर्स तपासून पहा.