OnePlus कडून स्मार्ट टीव्ही सीरिज लॉन्च, जाणून घ्या फिचर्सबद्दल अधिक
OnePlus TV U Series & OnePlus TV Y Series Launched in India (Photo Credits: OnePlus India)

OnePlus TV Y1S आणि OnePlus TV Y1S Edge स्मार्ट टीव्ही भारतात OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोनसह लॉन्च करण्यात आला आहे. वनप्लसचा हा नवा स्मार्ट टीव्हीची सीरिज वेगवेगळ्या दोन स्क्रिनमध्ये येणार आहे. त्यानुसार 32 इंच आणि 43 इंचाच्या मॉडेलचा समावेश आहे. दोन्ही सीरिज अॅन्ड्रॉइड टीव्ही 11 प्लॅटफॉर्मसह येणार आहे. डॉल्बी अॅटमॉसचा सपोर्ट ही दिला गेला आहे. वनप्लसने असे म्हटले आहे की, टीव्ही मध्ये ऑटो लो लेटेंसी मोड असून जो त्याला उत्तम बनवणार आहे.(Realme 9 Pro 5G आणि Realme 9 Pro+ 5G आज होणार भारतात लाँच; 'अशी' पाहू शकता लाईव्ह स्ट्रीमिंग, जाणून घ्या संभाव्य किंमत)

बेस वनप्लस टीव्ही Y1S 32 इंचाच्या मॉडेलची किंमत 16,499 रुपये आहे. तर 43 इंचाच्या मॉडेलसाठी 26,999 रुपये द्यावे लागणार आहेत. नव्या वनप्लस टीव्ही Y1S एज वेरियंटची किंमत क्रमश: 16,999 रुपये आणि 32 इंच व 43 इंचाच्या मॉडेलसाठी 27,999 रुपये ठेवण्यात आली आहे. दोन्ही टीव्हीचा सेल 21 फेब्रुवारीला येणार आहे. टीव्हीला वनप्लसची वेबसाइट, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि देशभरातील काही ऑफलाइन सेलर्समध्ये खरेदी करता येणार आहे.(Garena Free Fire वर भारतात बंदी का घालण्यात आली? समोर आले मुख्य कारण, जाणून घ्या सविस्तर)

OnePlus TV Y1S आणि Y1S Edge हे दोन वेगवेगळ्या स्क्रिन साइजसह येणार आहे. दोन्ही सीरिजच्या 32 इंचाच्या मॉडल एचडी रिजॉल्यूशनला सपोर्ट करणार आहे. दोन्ही डिस्प्ले मध्ये HDR10, HDR10+ आणि HLG फॉर्मेट सपोर्ट ही दिला गेला आहे. अॅन्ड्रॉइड टीव्ही 11 प्लॅटफॉर्मद्वारे संचालित आहे. Y1S मध्ये 20W स्टिरियो स्पीकर दिले गेले आहे. तर Y1S एज लाइनअप 24W स्टीरियो स्पीकर लैस आहे.