Garena Free Fire वर भारतात बंदी का घालण्यात आली? समोर आले मुख्य कारण, जाणून घ्या सविस्तर
Garena Free Fire (PC - Tech Takneek @TechTakneek/twitter)

Garena Free Fire Banned in India: भारत सरकारने पुन्हा एकदा डिजिटल स्ट्राइक अंतर्गत 54 चीनी अॅप्सवर बंदी घातली आहे. या अॅप्समध्ये लोकप्रिय बॅटल रॉयल गेम गॅरेना फ्री फायर (Garena Free Fire) देखील समाविष्ट आहे. या गेमवर बंदी आल्यानंतर मोबाईल गेम वापरकर्ते यापुढे त्याचा आनंद घेऊ शकत नाहीत. बंदी घालण्याच्या एक दिवस आधी, हा गेम Google Play Store आणि App Store वरून काढून टाकण्यात आला होता, त्यानंतर वापरकर्ते खूप नाराज झाले होते. आता भारतात या गेमवर बंदी घालण्यात आल्याची पुष्टी झाली आहे. मात्र, कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Garena Free Fire चायनीज नाही का?

काही लोकांचा असं वाटतंय की, गारेना फ्री फायर गेम चायनीज नाही, मग भारतात यावर बंदी का? पण बंदी घातलेल्या 53 अॅप्सप्रमाणे हे एक चिनी अॅप आहे. गारेना फ्री फायर – इल्युमिनेटचा समावेश 54 चायनीज अॅप्सच्‍या यादीत आहे. जे मूळ अॅप आहे आणि ते त्याच नावाने प्ले स्टोअरवर देखील उपस्थित होते. (वाचा -Chinese Apps Ban in India: चीनवर भारताचा डिजिटल स्ट्राइक; मोदी सरकारने Free Fire सह 54 चिनी अॅप्सवर घातली बंदी, येथे पहा यादी)

या कारणामुळे Garena Free Fire – Illuminate वर घालण्यात आली बंदी -

ET च्या अहवालानुसार, सरकारने त्या अॅप्सवर बंदी घातली आहे जे 2020 मध्ये बंदी घातलेल्या अॅप्सचे क्लोन आहेत. या अॅप्समुळे वापरकर्त्यांची गोपनीयता आणि सुरक्षा धोक्यात येऊ शकते. अहवालात असे सांगण्यात आले आहे की, बंदी घातलेले अॅप्स मालकी बदलून काम करत होते. त्यांचा डेटा हाँगकाँग आणि सिंगापूरसारख्या ठिकाणी होस्ट केला जात आहे. हा डेटा चीनमधील सर्व्हरपर्यंत पोहोचतो. गारेना फ्री फायर - इल्युमिनेट व्यतिरिक्त, बहुतेक प्रतिबंधित अॅप्स टेनसेंट आणि अलीबाबा ग्रुपशी संबंधित आहेत.