वन प्लस (OnePlus) कंपनीचा नवे स्मार्टफोन आज भारतात लॉंच झाले आहेत. कंपनीने गेल्या काही दिवसापूर्वी वन प्लस 8 (OnePlus 8) आणि वन प्लस 8 प्रो (OnePlus 8 Pro) या 2 स्मार्टफोनची लॉंचिंग करणार असल्याची घोषणा केली होती. यामुळे सर्व स्मार्टफोन चाहत्यासांठी उत्सुकता लागली होती. भारतात वन प्लस कंपनी लाईव्ह स्टिमिंगच्या माध्यमातून त्यांच्या दोन्ही स्मार्टफोन लॉंच केले आहेत. वन प्लस कंपनीने हे दोन्ही स्मार्टफोन रिसर्च करून बनवण्यात आला आहे, असा खुलासा केला होता. तसेच हे दोन्ही स्मार्टफोन बाजारात दाखल झाल्यानंतर अधिक प्रसिद्धी मिळवतील, असा विश्वास कंपनीच्या अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे. सध्या या दोन्ही स्मार्टफोनमधील फिचरची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. तर जाणून घेऊन वन प्लसच्या नव्या स्मार्टफोनची फिचर्स आणि किंमत
कंपनीचे सीईओ Pete Lau ने आपल्या मुलाखातीत सांगितले होते की, वन प्लस कंपनीचे बाजारात येणारे महागडे असणार आहेत. तसेच हा स्मार्टफोन ग्लेशियर ग्रीन कलर मध्ये बाजारात दाखल होणार असल्याचे स्पष्ट केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, युरोप मध्ये वन प्लस 8 स्मार्टफोनची सुरुवाती किंमत 41 हजार 999 आहे. तर, वन प्लस स्मार्टफोनची सुरुवात किंमत 54 हजार 999 रुपये आहे. हे देखील वाचा-ई-कॉमर्स वेबसाईट्सला लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक नसलेल्या गोष्टी पुरवण्यास बंदी, गृहमंत्रालयाचे आदेश
युट्यूब व्हिडिओ-
वन प्लस 8 प्रो मध्ये 6. 78 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. तर, वन प्लस 8 मध्ये 6.55 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच वन प्लस 8 प्रो मध्ये 4 हजार 510 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. तर वन प्लस 8 मध्ये 4 हजार 300 एमएएच बॅटरीचा समावेश करण्यात आला आहे.