Nokia कंपनीचा नवा स्मार्टफोन 108MP कॅमेऱ्यासह होणार लॉन्च, रिपोर्ट्समधून खुलासा
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

नोकिया कंपनीने नुकचा त्यांचा Nokia X10 आणि Nokia X20 स्मार्टफोन लॉन्च केला होता. अशातच आता कंपनी आपला नवा स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. याच दरम्यान एक रिपोट्स सुद्धा समोर आला आहे. त्यात असे म्हटले आहे की, कंपनीच्या आगामी स्मार्टफोन बद्दल अधिकम माहिती दिली गेली आहे. तर नोकिया पॉवर युजरच्या रिपोर्टनुसार, कंपनीचा अपकमिंग स्मार्टफोन Nokia 8.3 5G चे अपग्रेडेड वर्जन असणार आहे. बाजारात Nokia X50 नावाने तो उतरला जाऊ शकतो. स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे तर या आगामी डिवाइसमध्ये 6,000mAh ची बॅटरी आणि Snapdragon 775 प्रोससर दिला जाऊ शकतो.(Xiaomi ने भारतात लाँच केला iPhone ला टक्कर देणारा Mi 11 Ultra स्मार्टफोन, वैशिष्ट्ये ऐकून तुम्हीही व्हाल थक्क)

तसेच फोनमध्ये पेंटा रियर कॅमेरा सेटअप मिळण्याची शक्यता आहे. त्यात 108MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स असणार आहे. मात्र अन्य सेंसर्स बद्दल माहिती मिळालेली नाही. या व्यतिरिक्त युजर्सला डिवाइसमध्ये 6.5 इंचाचा क्युएचडी प्लस डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. नोकियाने आतापर्यंत अपकमिंग स्मार्टफोन संबंधित कोणतीच माहिती दिलेली नाही. मात्र लीक माहितीनुसार, कंपनी आगामी स्मार्टफोन पुढील महिन्याच्या सुरुवातीला लॉन्च करण्यासह त्याची प्रीमियम किंमत ठेवू शकते.

दरम्यान, कंपनीने या महिन्याच्या सुरुवातीला उतरवलेल्या नोकिया जी10 आणि जी20 स्मार्टफोन हा जवळजवळ12 हजार आणि 15 हजार रुपयांच्या किंमतीमध्ये उपलब्ध करुन दिला होता. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले LCD सपोर्ट मिळणार आहे. याचे रेज्यॉल्यूशन 720 पिक्सल असणार आहे. फोनचा आस्पेक्ट रेश्यो 20:9 असणार आहे. प्रोसेसर बद्दल बोलायचे झाल्यास Nokia G10 स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G25 चा सपोर्ट मिळणार आहे.(Poco M2 Reloaded भारतात झाला लाँच, 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा असलेल्या या स्मार्टफोनची काय आहेत खास वैशिष्ट्ये)

नोकिया जी20 स्मार्टफोन Helio G35 चिपसेट सपोर्ट दिला गेला आहे. नोकिया जी20 मध्ये एक ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. याचा मुख्य कॅमेरा 13MP चा असणार आहे. या व्यतिरिक्त 2MP चा डेप्थ सेंसर आणि 2MP ची मॅक्रो लेन्स सपोर्ट मिळणार आहे.