Xiaomi ने भारतात लाँच केला iPhone ला टक्कर देणारा Mi 11 Ultra स्मार्टफोन, वैशिष्ट्ये ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
Xiaomi Mi 11 Ultra (Photo Credits: Twitter)

शाओमीच्या (Xiaomi) चाहत्यांना आतुरता असलेला नवा स्मार्टफोन Mi 11 Ultra अखेर भारतात लाँच झाला आहे. या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये आणि कॅमेरा फिचर्स पाहून हा भारतीय बाजारात धुडगूस घालणार हे नक्की झाले आहे. इतकेच काय तर हा आयफोन आणि या रेंजमधील ओप्पो आणि वनप्लसच्या स्मार्टफोन्सला देखील टक्कर देईल. हा स्मार्टफोन ड्युल डिस्प्ले, आणि ट्रिपल रियर कॅमे-यासह येतो. यात 5000mAhची बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनसह भारतीय बाजारात Mi 11X आणि Mi 11X Pro सुद्धा लाँच झाले आहेत.

Mi 11 Ultra स्मार्टफोनची किंमत 69,999 रुपये आहे. यात 128GB रॅम आणि 256GB UFS 3.1 स्टोरेज दिले आहे. हा स्मार्टफोन दोन रंगात उपलब्ध आहेत. हा स्मार्टफोन भारतात कधी उपलब्ध होणार याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.हेदेखील वाचा- Xiaomi Mi 11 Ultra 'या' तारखेला भारतात होणार लाँच, हा स्मार्टफोन असणार कॅमे-याच्या बाबतीत अव्वल

या स्मार्टफोनच्या डिस्प्ले विषयी बोलायचे झाले तर, यात 6.81 इंचाची 2k WQHD+ E4 AMOLED क्वाड कर्व्ड डिस्प्ले दिली आहे. जी 120Hz रिफ्रेश रेटसह येते. हँडसेटमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस प्रोटेक्शन दिले आहे. फोनमध्ये 1.1 इंचाचा AMOLED सेकेंडरी डिस्प्ले सुद्धा मिळतो. हा फोन Android 11 बेस्ड MIUI 12 वर काम करतो.

Mi 11 Ultra क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 SoC प्रोसेसरसह येतो. यात इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळतो. यात 50MP Samsung GN2 प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर 48MP चे दोन Sony IMX586 सेंसर मिळतात. ज्यात एक अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे आणि दुसरा टेली मॅक्रो सेंसर आहे. या स्मार्टफोनमध्ये 20MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

Mi 11 Ultra IP68 रेटिंगसह येतो. फोनमध्ये स्टिरिओ स्पीकर आहे, जे Harman Kardon ब्रँडिंगसह येतात. यात IR ब्लास्टर देखील आहे. या स्मार्टफोनच्या कनेक्टिव्हिटी विषयी बोलायचे झाले तर, यात 5G, 4G LTE, Wi-Fi 6, ब्लूटुथ 5.1, जीपीएस, NFC आणि टाईप सी चार्जिंग पोर्ट मिळतो. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली आहे, जी 67W वायर आणि वायरलेस चार्जिंग आणि 10W रिव्हर्स वायरलेस चार्जिंग मिळते. तसेच या फोनसह 55W चा चार्जर देखील मिळतो.