स्मार्टफोन चाहत्यांसाठी काहीशी आश्चर्यकारक आणि काहीशी आनंदाचीही बातमी. चक्क 7 कॅमेरे असलेला स्मार्टफोन तुमच्या भेटीला लवकरच येत आहे. Nokia 9 PureView असे या स्मार्टफोनचे नाव आहे. हा स्मार्टफोन याच महिन्यात लॉन्च होईल. या फोनची माहिती देणारे अनेक व्हिडिओ आणि फोटोही लीक झाले आहेत. ज्यात Nokia 9 PureView च्या फिचर्सबाबत माहिती सांगण्यात येत आहे. या स्मार्टफोनमध्ये असलेले कॅमेरे हा या स्मार्टफोनचा आकर्षणाचा मोठा केंद्रबिंदू आहे. लीक झालेल्या फोटोंमधून दावा करण्यात योतो आहे की, Nokia च्या स्मार्टफोनमध्ये तब्बल 7 कॅमेरे आहेत. फोनच्या रिअरमध्ये पेंटालेस कॅमेरा सेटअप असेल. म्हणजेच फोनच्या पाठीमागे 5 कॅमेरे लावलेले असतील. तर, फ्रंटला 2 कॅमेरे असतील.
या फोनचे कॅमेरे हाच या स्मार्टफोनचा सेलींग पॉईंट ठरण्याची शक्यता आहे. आतापर्यंत लीक झालेल्या रिपोर्टमधून पुढे आलेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोनमध्ये बॅकसाईडला असलेले दोन कॅमेरे 12-12 मेगापेक्सलचे असतील. तर, 2 कॅमेरे 16-16 मेगापिक्सल असतील. तर, पाचवा कॅमेरा 8 मेकापिक्सलचा असेल. Nokia 9 PureView च्या पाठिमागे देण्यात आलेल्या सेटअपमध्ये LED फ्लॅश आणि IR सेन्सर किंवा लेजर ऑटोफोकसही असण्याची शक्यता आहे.
सेल्फी चाहत्यांसाठी दोन सेल्फी कॅमेरे
या फओनच्या फ्रंट साईडला दोन कॅमेरे असतील जे खास सेल्फी चाहत्यांसाठी पर्वणी ठरु शकतील. स्मार्टफोन वर्तुळात सुरु असलेल्या चर्चेचा हवाला घेऊन सांगायचे तर, बोलले जात आहे की, या कॅमेऱ्यामध्ये पोट्रेट मोड आणि दमदार Bothie परफॉर्मन्स असू शकतो. दरम्यान, फएक रेकग्निशन फीचर आणि इतर बऱ्याच गोष्टी अद्याप पुढे आल्या नाहीत. लीक रिपोर्टनुसार, Nokia 9 PureView मध्ये 6 इंचाचा डिस्प्ले असू शकतो. हा स्मार्टफोन 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज ऑप्शन सोबत येऊ शकतो. (हेही वाचा, Xiaomi ने दिले न्यू इयर गिफ्ट; LED TV किमती केल्या कमी, पाहा ताजे रेट)
दरम्यान, स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रैगन 845 प्रोसेसर सोबत येऊ शकतो. मीडिया रिपोर्टमध्ये या फोनची किंमत 4,799 युआन (करीब 50,600 रुपये) असू शकते असा दावा केला जात आहे. ग्राहकांना आकर्शित करण्यासाठी फोनमध्ये HMD ग्लोबल नेक्स्ट जेनरेशन स्नॅपड्रैगन 855 SoC प्रोसेसरचा वापर केला जाऊ शकतो.