Xiaomi ने दिले न्यू इयर गिफ्ट; LED TV किमती केल्या कमी, पाहा ताजे रेट
Xiaomi LED TV | | (Archived, edited, representative images)

2019 या नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच शाओमी (Xiaomi) ने भारतातील ग्राहकांना आकर्षक भेट दिली आहे. Xiaomi ने भारतातील आपल्या Mi LED TV किमती कमी केल्या आहेत. यामध्ये शाओमीच्या 32 इंची Mi LED Smart TV 4A, Mi LED TV 4C PRO आणि 49 इंची Mi LED TV 4A PRO चा समावेश आहे. प्राप्त माहितीनुसार शाओमीचा 32 इंच वाल्या Mi LED Smart TV 4Aच्या किमतीत सुमारे 1,500 रुपये तर, Mi LED TV 4C PRO च्या किमतीत सुमारे 2,000 रुपयांची कपात केली आहे. तर, 49 इंचाच्या Mi LED TV 4A PRO च्या किमतीतही 1,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. मात्र, ग्राहक या कपात झालेल्या किमतींचा लाभ 1 जानेवारी 2019क या दिवशीच घेऊ शकणार आहेत.

किमती कितीने घटल्या?

मॉडेलचे नाव इंच आगोदरची किंमत (रुपयांमध्ये) सध्याची किंमत (कपात दर)
Mi LED Smart TV 4A 32 15,999 14,499 रुपये
Mi LED TV 4C PRO 32 16,999 14,999
Mi LED TV 4A PRO 49 -- 30,999

mi.comवरील आगोदरचे दर आणि सध्याचे दर

मॉडेलचे नाव इंच mi.com  वर आगोदरची किंमत (रुपयांमध्ये) mi.com  वर सध्याची किंमत (कपात दर)
Mi LED Smart TV 4A 32 13,999 12,499 रुपये
Mi LED TV 4C PRO 32 15,999 13,999

(हेही वाचा, JIO ची खास HAPPY NEW YEAR OFFER,399 च्या रिचार्जवर मिळणार पूर्ण कॅशबॅक)

किमती कमी होण्याचे कारण?

शाओमीने म्हटले आहे की, केंद्र सरकारने 32 इंची टेलिव्हीजनवर असलेला GST 28 टक्क्यांवरुन कमी करुन तो 18 टक्क्यांवर आणला आहे. त्यामुळे या मोठ्या फरकाचा थेट फायदा ग्राहकांना देण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. शाओमीने म्हटले आहे की, आम्ही कोणत्याही हार्डवेअर प्रॉडोक्टवर केवळ 5 टक्के किंवा त्याहून थोडेफार अधिक फायदा कमावतो. उर्वरित फायदा आम्ही आमच्या चाहत्या ग्राहकांना देतो.