तब्बल 5 रियर कॅमे-याने सुसज्ज असलेला Nokia 9 Pure View स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या या स्मार्टफोनचे जबरदस्त फिचर्स
Nokia 9 | (Archived, edited, representative images)

मोबाईल जगतात लोकप्रिय अशी कंपनी म्हणजे नोकिया (Nokia) . नोकिया कंपनी आपल्या ग्राहकांना नेहमी काही ना काही नवनवीन गोष्टी देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे नोकियाच्या स्मार्टफोन्सकडे ग्राहकांचा कल असतो. त्यातच आता नोकियाने आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन नोकिया 9 प्युयर व्ह्यू (Nokia 9 Pure View) भारतात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन सर्वात आधी बार्सिलोनामध्ये Mobile World Congress 2019 च्या कार्यक्रमात लाँच करण्यात आला होता. या स्मार्टफोनची किंमत 49,999 रुपये इतकी आहे. या स्मार्टफोनचा आकर्षणाचा भाग म्हणजे या स्मार्टफोनमध्ये 1 नाही, 2 नाही तर तब्बल 5 कॅमेरे देण्यात आले आहे.

हा स्मार्टफोन 17 जुलै पासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध होईल. हा स्मार्टफोन तुम्ही फ्लिपकार्टवर खरेदी करु शकता. तसेच काही रिटेल स्टोर्समध्येही हा स्मार्टफोन उपलब्ध होईल. Nokia 9 Pure View सह कंपनी ने काही ऑफर्सची सुद्धा घोषणा केली आहे. या ऑफर्स अंतर्गत 30 दिवसांच्या आता Nokia Mobile Cars द्वारे Nokia 9 Pure View च्या तज्ज्ञांसोबत हा स्मार्टफोन कसा हाताळावा याचे प्रशिक्षण दिले जाईल.

याच्या मर्यादित ऑफरमध्ये Nokia 9 Pure View सह Nokia 705 Earbuds सुद्धा दिले जातील, ज्याची किंमत 9999 रुपये इतकी आहे. इतकेच नव्हे तर Nokia च्या वेबसाईटवरुन हा स्मार्टफोन खरेदी केल्यास आपल्याला 5,000 रुपयाचे गिफ्ट वाउचर मिळेल.

जाणून घ्या Nokia 9 Pure View स्मार्टफोनची खास वैशिष्ट्ये:

या स्मार्टफोनमध्ये 5.99 इंचाची 2k POLED डिस्प्ले देण्यात आली आहे. हा स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर देण्यात आले आहे. तसेच स्मार्टफोन वायरलेस चार्जिंग ला सपोर्ट करतो.

ह्या स्मार्टफोनच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, ह्यात पेंटा लेस सेटअप रियर पॅनल दिला गेला आहे. यात 5 लेन्स 12 मेगापिक्सेल चे आहेत आणि सर्व एकत्र काम करतात. याने तुम्ही हाय रेंज चे फोटो क्लिक करु शकता.

हेही वाचा- 5 कॅमेरे असणारा Nokia 9 PureView चे फोटो सोशल मीडियावर लीक

Nokia 9 Pure View मध्ये अॅनड्रॉईड वन प्लेटफॉर्म दिला गेला आहे जो अॅनड्रॉईड 9 Pie बेस्ड आहे. या स्मार्टफोनमध्ये 3320mAh ची बॅटरी दिली गेली आहे. त्याचसोबत 18W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला गेला आहे.