![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/02/nokia-91-380x214.jpg)
HMD Global चा स्मार्टफोन Nokia9 PureView साठी युजर्स वाट पाहत होते. तर कंपनी हा स्मार्टफोन 24 फेब्रुवारी स्पेन (Spain) येथे होणाऱ्या MWC2019 मध्ये लॉन्च करणार आहे. मात्र हा फोन लॉन्च होण्यापूर्वीच त्याचे फोटो सोशल मीडियावर लीक झाले आहेत. नोकिया कंपनीच्या पॉवर युजर्स वेबसाईटने याबाबतचे फोटो पोस्ट केले होते.
फोटो पाहिल्यावर असे कळते की, फोनला राऊंड एजसह मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. तर फोनच्या वरील बाजूस सेंसर देण्यात आला आहे. त्याचसोबत नोकिया प्युअर व्हुव हा 5.99 इंच असलेला AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो क्वॅडएचडी आणि रेजॉल्यूशन उपलब्ध करुन देतो. तर नोकियाचा हा पहिला स्मार्टफोन आहे ज्यामध्ये प्रथमच फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आले आहे.
Nokia 9 Live images leaks with Penta cameras before the launch on February 24 in MWC 2019#Nokia #NokiaMobile #nokia9 https://t.co/73qxd3Ngn3 pic.twitter.com/l1kGYuzQQK
— #Newsgainers (@newsgainers) February 10, 2019
या स्मार्टफोनला ग्लास फिनिशिंग दिले असल्याने त्याला एक प्रिमिअम लूक देतो. 6GB RAM, 12GB Storage देण्यात आले आहे. फोनसाठी स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेरप देण्यात आले आहे. तर बॅटरी 4,150mAप देण्यात आली आहे.