नोकीया (Nokia) स्मार्टफोन कंपनी 7 मे रोजी Nokia 4.2 हा नवा स्मार्टफोन बाजारात लॉन्च करत आहे. या स्मार्टफोनमध्ये LED नोटिफिकेशन लाईटसह पावर बटण देण्यात आले आहे. त्याचबरोबर गुगल असिस्टेंट बटण देखील आहे. त्याचबरोबर काय आहेत या स्मार्टफोनचे फिचर्स आणि किंमत, जाणून घेऊया... (5 कॅमेरे असणारा Nokia 9 PureView चे फोटो सोशल मीडियावर लीक)
Nokia 4.2 ची किंमत:
नोकीया 4.2 स्मार्टफोनची आंतरराष्ट्रीय किंमत 2GB + 16GB वेरिएंटसह सुमारे 11,700 रुपये आहे. तर 3GB + 32GB या वेरिएंटची किंमत 13,800 रुपये आहे.
Nokia 4.2 चे फिचर्स:
Nokia 4.2 या अॅनरॉईड स्मार्टफोनमध्ये 5.71 इंच HD+ डिस्प्ले (720x1520 पिक्सल) , TFT डिस्प्ले दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 3GB रॅमसह ग्राहकांना ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 439 प्रोसेसर मिळेल. या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचे कॅमेरे देण्यात आले आहेत. तर 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिव्हीटीसाठी यात 4G LTE, Wi-Fi 802.11 b/g/n,ब्लुटूथ v4.2, GPS/ A-GPS, NFC, मायक्रो-USB आणि 3.5mm चा हेडफोन जॅक देण्यात आला आहे. यात 3,000mAh ची बॅटरी असून फिंगरप्रिंट स्कॅनर हे फिचरही देण्यात आले आहे.