Realme कंपनीचे नवीन मॉडेल Realme 3 या स्मार्टफोनसाठी आज मंगळवार (12 मार्च) पासून पहिला सेल सुरु होणार आहे. तर गेल्या आठवड्यात रेलमी 3 स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आला होता. ग्राहकांना हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवरुन खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनसाठी रियरसाठी डुअल कॅमेरा सेटअप आणि 4230mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. त्याचसोबत Realme U1 मध्ये देण्यात आलेला Media Tek Helio P70 प्रोसेसर सुद्धा दिला आहे.
भारतात 3GB RAM/32 GB स्टोरेज आणि 4GB RAM/64GB स्टोरेज मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 8,999 रुपये आणि 10,999 रुपये ठेवण्यात आली आहे. आज सुरु होणाऱ्या सेलमध्ये ग्राहकांना हा स्मार्टफोन ब्लॅक आणि डायनामिक ब्लॅक रंगात खरेदी करता येणार आहे. तसेच 26 मार्च रोजी यामधील वेरियंट ब्लू कलरचा स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.(हेही वाचा-18 मार्च रोजी Redmi 7 स्मार्टफोन लॉन्च होण्याची शक्यता, जाणून घ्या खास फिचर्स)
या स्मार्टफोनची विक्री आज 12 वाजल्यापासून सुरु होणार आहे. तसेच ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर, HDFC बँक कार्डवर 500 रुपयांचा इनस्टँड डिस्काउंट मिळणार आहे. फ्लिपकार्टवर जियो तर्फे 5,300 रुपया पर्यंतचे फायदे देण्यात आले आहेत. त्याचसोबत रेलमीची वेबसाईचवर सुद्धा MobiKwik वर 20 टक्के सुपरकॅश ऑप्शन देण्यात आला आहे.