18 मार्च रोजी Redmi 7 स्मार्टफोन लॉन्च होण्याची शक्यता, जाणून घ्या खास फिचर्स
Redmi 7 (Photo Credits-Facebook)

Xiaomi कंपनीचा स्मार्टफोन Redmi 7 येत्या 18 मार्च रोजी लॉन्च होण्याची शक्यता आहे. त्याचसोबत या दिवशी शाओमी कंपनी अन्य नवीन प्रोडक्ससुद्धा लॉन्च करणार आहे. रिपोर्टनुसार, रेडमी 7 लवकरच लॉन्च होणार असल्याची चर्चा सुरु होती.

रेडमी मुख्याधिकारी Lu Weibing यांनी एका Weibo पोस्टद्वारे रेडमी नोट 7 प्रो स्मार्टफोनबाबत येत्या 18 मार्च रोजी लॉन्च होणार असल्याचे सांगितले आहे. परंतु अद्याप हे प्रोडक्ट कोणते असणार आहे याबद्दल खुलासा केला नाही आहे. मात्र मिळालेल्या रिपोर्टनुसार हा स्मार्टफोन रेडमी 7 असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.(हेही वाचा-Xiaomi फ्री देत आहे 100 जणांना Redmi Note 7 Pro, पण 'ही' आहे अट)

जानेवारी महिन्यात रेडमी 7 या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत सांगण्यात आले होते. या स्मार्टफोनसाठी 3.5mm हेडफोन जॅक आणि IR ब्लास्टर असणार आहे. त्याचसोबत स्मार्टफोनसाठी मोठी बॅटरी देण्यात आली आहे. TENAA लिस्टिंगमधून असे समोर आले आहे की, 4000mAh ची बॅटरी स्मार्टफोनसाठी देण्यात आली आहे.

लिस्टिंगच्या म्हणण्यानुसार, यामध्ये 6.26 इंच LED डिस्प्ले,ऑक्टा-कोर प्रोसेसर, 4GB RAM, 64GB Storage, 12 मेगापिक्सल रियर कॅमेरा आणि 8 पिक्सल फ्रंट कॅमेरा असणार आहे. रेडमी 7 मध्ये अँन्ड्रॉईड 9 पाई बेस्ट MIUI 10 देण्यात आले असल्याची शक्यता आहे.