Navratri Special Discount on Vivo Smartphones: X70, Y73 आणि V21 सिरीजवर नवरात्री निमित्त खास डिस्काऊंट; पहा काय आहेत ऑफर्स
Vivo (Photo Credits: Twitter)

व्हिवो (Vivo) या चायनीज स्मार्टफोन कंपनीने आपल्या काही खास स्मार्टफोन्सवर नवरात्री निमित्त डिस्काऊंट (Navratri Special Discount) घोषित केला आहे. व्हिवो एक्स 70 (Vivo X70), व्हिवो व्हि 21 सिरीज (Vivo V21 Series), व्हिवो वाय 73 (Vivo Y 73) आणि व्हिवो वाय 33 (Vivo Y 33) एस या स्मार्टफोन्सवर आकर्षक डिस्काऊंट आणि कॅशबॅक मिळणार आहे. ही ऑफर सर्व ऑफलाईन रिटेल पार्टनर्सकडे उपलब्ध असून 15 ऑक्टोबरपर्यंत या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. (Amazon Great Indian Festival Sale 2021 सर्वांसाठी लाईव्ह; iPhone 11, Galaxy M52 5G, Apple Watch SE वर काय आहेत डिल्स?)

बजाज फायनान्स च्या कार्डवरुन तर केवळ 101 रुपयांत तुम्हाला व्हिवो चे स्मार्टफोन ईएमआयवर विकत घेऊ शकता. तसेच आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा आणि आयडीएफसी फर्स्ट बँक आणि एचबीडी फायन्सासच्या ग्राहकांना 10 टक्के कॅशबॅक देखील मिळू शकतो. हे स्मार्टफोन्स तुम्ही नो-कॉस्ट ईएमआयवर देखील खरेदी करु शकता. जाणून घेऊया या स्मार्टफोन्सची खासियत आणि किंमत...

व्हिवो एक्स 70 सिरीज:

व्हिवो एक्स 70 सिरीजच्या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 888+ प्रोसेसर दिला असून यामध्ये 8जीबी+128जीबी आणि 12जीबी+256जीबी हे दोन वेरिएंट उपलब्ध आहेत. एक्स 70 प्रो च्या 8 जीबी+128जीबी वेरिएंटची किंमत 46,990 रुपये इतकी असून 12जीबी+256जीबी वेरिएंटची किंमत 52,990 रुपये आहे. तर एक्स 70 प्रो + च्या 12जीबी+256जीबी वेरिएंटची किंमत 79,990 रुपये आहे.

व्हिवो व्हि 21 सिरीज:

व्हिवो व्हि 21 मध्ये मीडियाटेकचा डायमेन्सिटी 800 यु प्रोसेसर दिला असून यात ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 8जीबी+128जीबी वेरिएंटची किंमत 29,990 रुपये असून 8जीबी+256जीबी वेरिएंटची किंमत 32,990 रुपये इतकी आहे. तर मीडियाटेक डायमेन्सिटी 700 प्रोसेसर असलेला व्हि 21 ई या स्मार्टफोनच्या 8जीबी+128जीबी वेरिएंटची किंमत 24,990 रुपये आहे.

वाय 73 आणि वाय 33 एस:

व्हिवो वाय 73 मध्ये मीडियाटेकचा हेलिओ जी 95 प्रोसेसर दिला असून यात ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 8जीबी+128जीबी वेरिएंटची किंमत 20,990 रुपये इतकी आहे. तर व्हिवो वाय 33 एस या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकचा हेलिओ जी 80 प्रोसेसर दिला असून याच्या 8जीबी+128जीबी वेरिएंटची किंमत 17,990 रुपये आहे.

नवीन स्मार्टफोन खरेदी करु इच्छिणाऱ्या आणि व्हिवो चा स्मार्टफोन करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे.