Amazon Great Indian Festival Sale 2021 आजपासून सर्वांसाठी लाईव्ह; iPhone 11, Galaxy M52 5G, Apple Watch SE वर काय आहेत डिल्स?
Amazon Great Indian Festival Sale 2021 (Photo Credits: Amazon India)

अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टीव्हल सेल 2021 (Amazon Great Indian Festival Sale 2021) आजपासून सर्व युजर्ससाठी लाईव्ह झाला आहे. प्राईम मेंबर्संना (Prime Members) याचा अॅक्सेस 24 तास आधीच मिळाला होता. या सेल अंतर्गत स्मार्टफोन्स (Smartpones), लॅपटॉप्स (Laptops), टॅबलेट्स (Tablets), स्मार्ट टीव्ही (Smart TV), फॅशन प्रॉडक्ट (Fashion Products) आणि इत्यादींवर आकर्षक ऑफर्स आणि डिस्काऊंट्स दिले जात आहे. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरुन (HDFC Bank Credit & Debit Card) खरेदी केल्यास 10 टक्क्यांच्या इन्स्टट डिस्काऊंट दिला जात आहे. ही ऑफर ईएमआय (EMI) पर्यायवर देखील उपलब्ध आहे. हा सेल महिनाभर चालणार असून प्रॉडक्टवर चांगला डिस्काऊंट पहिल्या दोन दिवसांत मिळणार आहे. या सेल अंतर्गत अॅमेझॉनद्वारे देण्यात आलेल्या काही खास डिल्स पाहुया... (Flipkart Big Billion Days Sale 2021 सार्‍यांसाठी लाईव्ह; iPhone 12, Pixel 4a ते स्मार्ट टीव्ही वर पहा काय आहेत ऑफर्स?)

Apple iPhone 11:

Apple iPhone 11 चे 64GB वेरिएंट 38,999 रुपयांना उपलब्ध असून 128GB आणि 256GB वेरिएंट अनुक्रमे 43,999 आणि 59,999 रुपयांना उपलब्ध आहे. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरुन खरेदी केल्यास ग्राहकांना 10 टक्क्यांएकचा इन्स्टट डिस्काऊंट दिला जात आहे. त्याचबरोबर नो-कास्ट ईएमआय चा पर्याय देण्यात आला असून एक्सचेंज ऑफर अंतर्गत युजर्संना 13,150 रुपयांची सूट मिळू शकते. ईएमआयचा पर्याय निवडल्यास तुम्हाला कमीत 2824 रुपयांचा प्रति महिना ईएमआय भरावा लागेल.

Apple iPhone 11 (Photo Credits: Amazon)

Samsung Galaxy M52 5G:

या स्मार्टफोनचा 6GB+128GB वेरिएंट 25,999 रुपयांना तर 8GB+128GB वेरिएंट 27,999 रुपयांना अॅमेझॉन इंडियावर उपलब्ध आहे. हा फोन खरेदी करताना एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड, क्रेडिट ईएमआयचा पर्याय निवडल्यास युजर्संना 1500 रुपयांचा डिस्काऊंट मिळू शकतो. तसेच एक्सचेंज ऑफर अंतर्गत ग्राहकांना 16,950 रुपयांचा डिस्काऊंट मिळू शकतो.

Samsung Galaxy M52 5G (Photo Credits: Samsung)

Apple Watch SE (GPS):

Apple Watch SE (GPS) चे 40mm चे मॉडल 23,900 रुपयांना अॅमेझॉनवर उपलब्ध आहे. तर याचे 44mm चे मॉडल 25,900 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच हे डिव्हाईस खरेदी करताना तुम्ही ईएमआय किंवा नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील निवडू शकता.

Apple Watch SE (Photo Credits: Apple)

OnePlus 9R:

OnePlus 9R स्मार्टफोन वनप्लस तर्फे 39,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता. परंतु, अॅमेझॉन इंडियाच्या सेल अंतर्गत या स्मार्टफोनचा 8GB+128GB वेरिएंट 36.999 रुपयांना तर 12GB+256GB वेरिएंट 40,999 रुपयांना उपलब्ध आहे. खरेदी करताना एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डचा पर्याय निवडल्यास ग्राहकांना 2000 रुपये डिस्काऊंट मिळेल. तसेच एक्सचेंज ऑफर अंतर्गत युजर्संना 19,950 रुपयांची सूट मिळू शकते.

OnePlus 9R (Photo Credits: OnePlus)

Asus TUF Gaming F15:

हा गेमिंग लॅपटॉप 84,990 रुपयांना उपलब्ध होता. परंतु, अॅमेझॉन सेल अंतर्गत तुम्ही हा लॅपटॉप केवळ 56,999 रुपयांना विकत घेऊ शकता. एक्सचेंज ऑफर अंतर्गत ग्राहकांना 17,850 रुपयांची सूट मिळू शकते. असूस टीयुएफ गेमिंग एफ15 लॅपटॉप 10 व्या जनरेशनचा इन्टेल कोर आयफाय प्रोसेसर, 8जीबी रॅम आणि 512 जीबी एसएसडी देण्यात आली आहे.

Asus TUF Gaming F15 (Photo Credits: Amazon India)

यासोबतच एलजी 55 इंच 4K Ultra HD Smart OLED TV, Echo smart speakers, Kindle e-readers, Fire TV Stick, iQOO Z3 5G, Redmi Note 10 Pro, Galaxy Note 20, iPhone XR, Galaxy S20 FE 5G, iPad Air 2020, Jabra Elite 75t TWS earbuds यावर आकर्षक डिस्काऊंट देण्यात येत आहे.