Flipkart Big Billion Days Sale 2021 सार्‍यांसाठी लाईव्ह; iPhone 12, Pixel 4a ते स्मार्ट टीव्ही वर पहा काय आहेत ऑफर्स?
Flipkart Big Billion Days Sale 2021 (Photo Credits: Flipkart)

Flipkart Big Billion Days Sale 2021 आता सार्‍या ग्राहकांसाठी लाईव्ह करण्यात आला आहे. स्मार्टफोन, स्मार्टवॉच ते हेडफोन्स पर्यंत अनेक कॅटेगरीमध्ये सध्या या ई कॉमर्स वेबसाईट वरून तगड्या ऑफर्सची, डिस्काऊंट्सची घोषणा करण्यात आली आहे. फ्लिपकार्टने यंदा ऑफर्स साठी अ‍ॅक्सिस बॅंक, आयसीआयसीआय बॅंक यांच्यासोबत हातमिळवणी केली आहे. त्यांच्या कार्ड्सद्वारा ग्राहकांना 10% थेट डिसकाऊंट मिळणार आहे. पेटीएम वॉलेट वर 200 रूपयांचं कॅशबॅक मिळणार आहे. मग यंदाच्या फ्लिपकार्ट बिग बिलयन डेज सेल मध्ये कोणत्या धमाकेदार ऑफर्स आहेत. नक्की वाचा: Amazon Great Indian Festival Sale 2021 मध्ये Redmi 9A, Samsung Galaxy Note 20, Tecno Spark 7T आणि Vivo स्मार्टफोन्सवर मिळतील आकर्षक डिल्स.

iPhone 12, iPhone 12 Mini:

आयफोन 13 ची घोषणा होताच आयफोन 12 च्या किंमती कमी झाल्या आहे. यंदाच्या सेल मध्ये iPhone 12 64GB हा Rs 49,999 ला उपलब्ध आहे तर 128GB Rs 55,999 आणि 256GB Rs 66,999 ला उपलब्ध आहे.

iPhone 12 Mini हा Rs 38,999 (64GB) ला उपलब्ध आहेत तर 128GB आणि 256GB साठी अनुक्रमे Rs 43,999 आणि Rs 53,999 मोजावे लागणार आहेत. नक्की वाचा: Apple ची खास ऑफर; 7 ऑक्टोबर रोजी iPhone 12 Mini किंवा iPhone 12 खरेदी केल्यास AirPods मिळतील फ्री.

Google Pixel 4a:

Google Pixel 4a हा स्मार्टफोन Rs 25,999 ला उपलब्ध आहे. Axis, ICICI Bank credit/debit cards असल्यास तुम्हांला 10% थेट डिस्काऊंट मिळणार आहे. तर नो कॉस्ट इएमआयचा पर्याय निवडल्यास Rs 4,334 चा हफ्ता असणार आहे.

Realme 8i:

नुकताच लॉन्च झालेल्या Realme 8i या स्मार्टफोनसाठी 4GB + 64GB variant करिता 12,999 रूपये मोजावे लागणार आहेत. तर 6GB + 128GB साठी 14,999 रूपये मोजावे लागतील.

Apple MacBook Air:

Apple's MacBook Air with M1 Chip हा यंदाच्या फ्लिपकार्ट सेल मध्ये 8GB + 256GB मॉडेलसाठी 80 हजारांमध्ये उपलब्ध होणार आहे. Axis, ICICI Bank credit/debit cards वापरल्यास किंमती अजून कमी होणार आहेत. नो कॉस्ट इएमआय पर्याय निवडल्यास Rs 13,334 चा हफ्ता असणार आहे.

दरम्यान या सोबतच Nothing Ear1, Asus VivoBook K15 OLED 2021, Realme 32-inch स्मार्ट टीवी , Mi 4A Pro 32-inch स्मार्ट टीवी , Asus Core i3 10th Gen लॅपटॉप, Realme C11 स्मार्टफोन, Poco M3, Redmi 9i, Realme Watch S, Samsung F22, Oppo A53s 5G, Poco X3 Pro, Motorola ge 20 Fusion, RoG Phone 5, Galaxy F42 5G, Narzo 50i, Narzo 50A वर दमदार ऑफर्स आहेत.