Apple ची खास ऑफर; 7 ऑक्टोबर रोजी iPhone 12 Mini किंवा iPhone 12 खरेदी केल्यास AirPods मिळतील फ्री
Apple iPhone 12 Free AirPods Offer (Photo Credits: Apple)

अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल (Amazon Great Indian Festival Sale) 2021 आणि फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल (Flipkart Big Billion Days Sale) 3 ऑक्टोबर सुरु होणार आहेत. दोन्ही सेलमध्ये स्मार्टफोन, स्मार्टवॉच, इयरफोन आणि इतर प्रॉड्क्टसवर आकर्षक ऑफर्स आणि मोठ्या प्रमाणात सूट मिळेल. अॅपल (Apple) कंपनी या सेलमध्ये एक नवीन ऑफर घेऊन आली आहे.

या ऑफर अंतर्गत 7 ऑक्टोबर 2021 रोजी आयफोन 12 मिनी किंवा आयफोन 12 च्या खरेदी केल्यास एअरपॉड्स मोफत मिळतील. मात्र फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन इंडियाच्या सेलमध्ये अॅपल आयफोन 12 मिनी आणि आयफोन 12 या दोन्हीवर फोन्सवर कोणतीही सूट दिली जाणार नाही. (Apple iPhone 13: भारतामध्ये Amazon, Flipkart वर iPhone 13,iPhone 13 Mini उपलब्ध; Pro,Pro Max व्हेरिएंट्स Sold Out!)

आयफोन 12 मिनी आणि आयफोन 12 अॅपल इंडियाच्या ऑनलाईन स्टोअरद्वारे देखील ग्राहक खरेदी करू शकतात. कंपनीने या ऑफेरचे एक पोस्टर देखील जारी केले आहे. या पोस्टरमध्ये आयफोनसोबत सेकंड जनरेशन एअरपॉड्स सुद्धा दाखवले आहेत ज्याची किंमत 14,900 रुपये आहे. आयफोन 12 मिनी 64 जीबी मॉडेलची किंमत 59,900 रुपये, 128 जीबी आणि 256 जीबी व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे 64,900 आणि 74,900 रुपये आहे.

आयफोन 12 बेस मॉडेल 65,900 पासून सुरू होतो, तर टॉप-एंड व्हेरिएंट 80,900 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. दोन्ही मॉडेलमध्ये एचडीआर आणि फेस आयडी सपोर्टसह अनुक्रमे 5.4-इंच आणि 6.1-इंच डिस्प्ले दिला आहे. आयफोन 12 मिनी आणि आयफोन 12 मध्ये 12 MP ड्युअल रिअर कॅमेरा सिस्टम आणि 12 MP सेल्फी स्नॅपर आहे. आयफोन 12 मध्ये A14 बायोनिक प्रोसेसर आहे आणि 256GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये वाय-फाय 6, ब्लूटूथ, ड्युअल सिम, 5G आणि GPS यांचा समावेश आहे.