Amazon Great Indian Festival Sale 2021 मध्ये Redmi 9A, Samsung Galaxy Note 20, Tecno Spark 7T आणि Vivo स्मार्टफोन्सवर मिळतील आकर्षक डिल्स
Amazon Great Indian Festival Sale 2021 (Photo Credits: Amazon India)

अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टीव्हल सेल 2021 (Amazon Great Indian Festival Sale 2021) ला 3 ऑक्टोबर  पासून सुरुवात होणार आहे. या सेल अंतर्गत स्मार्टफोन्स (Smartphones), स्मार्टवॉचेस (Smartwatches), ईअरबड्स (Ear Buds), इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि इत्यादी गोष्टींवर आकर्षक ऑफर्स मिळत आहेत. या सेलसाठी कंपनीने एचडीएफसी बँकेसोबत (HDFC Bank) टायअप केले असून एचडीएफसी बँकेच्या डेबिट (HDFC Bank Debit Card), क्रेडिट कार्ड (Credit Card) वरुन खरेदी केल्यास आणि EMI पर्याय घेतल्यास  10 टक्क्यांचा इन्स्टंट डिस्काऊंट मिळत आहे. (Amazon Great Indian Festival Sale 2021: येत्या 3 ऑक्टोंबर पासून अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हलच्या सेलला होणार सुरुवात)

सेलपूर्वी ई-कॉमर्स जाएंटने विविध स्मार्टफोन्सवरील डिल्स विषयी माहिती दिली आहे. त्यानुसार याRedmi 9A, Tecno Spark 7T, Galaxy Note 20 आणि Vivo च्या स्मार्टफोन्सवर विविध डिल्स मिळत आहेत. अॅमेझॉन प्राईम मेंबर्संना या डिल्स आणि डिस्काऊंटचा लाभ आधी घेता येणार आहे.

Amazon India च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, Redmi 9A मध्ये 6.53 इंचाचा डिस्प्ले, 5000mAh ची बॅटरी आणि Helio G25 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन 6,799 रुपयांना उपलब्ध आहे. Samsung Galaxy Note 20 मध्ये AMOLED Infinity डिस्ल्पे देण्यात आला असून हा स्मार्टफोन 44,999 रुपयांना उपलब्ध आहे.

Amazon Great Indian Festival Sale 2021 (Photo Credits: Amazon)

Samsung Galaxy Note 20 Ultra 5G हा स्मार्टफोन अॅमेझॉन इंडियावर 69,999 रुपयांना उपलब्ध आहे. तर Vivo V21e 5G 24,990 रुपयांना खरेदी करता येईल. Vivo Y73 ची 20,990 रुपयांना विक्री होत आहे. तर Vivo X60 स्मार्टफोन 34,990 आणि Vivo Y20G 2021 हा स्मार्टफोन 19,990 रुपयांना मिळत आहे. सेलमध्ये विवो फोन्सवर एक्सचेंज डिल्स अंतर्गत 3000 रुपयांची सूट मिळत आहे.

Tecno Spark 7T 8499 रुपयांना उपलब्ध असून याची मूळ किंमत 9,499 इतकी आहे. दरम्यान, 1 ऑक्टोबर पर्यंत दररोज दुपारी 12 वाजेपर्यंत अॅमेझॉन मेगा डिल्स सादर करणार आहेत. सेल दरम्यान Xiaomi 11 Lite NE 5G स्मार्टफोन देखील लॉन्च करण्यात येईल.

Amazon Great Indian Festival Sale 2021 (Photo Credits: Amazon)

iQOO फोन्सवरील डिल्स उद्या जाहीर करण्यात येतील. याशिवाय हेडफोन्स, स्पीकर्सवर 80 टक्के ऑफ दिला जात आहे. तर फिटनेस बँड्सवर 60 टक्के, टॅबलेटवर 45 टक्के आणि लॅपटॉपवर 50 टक्के ऑफ दिला जात आहे.