टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) मोबाईल क्रमांक पोर्ट करण्यासाठी नवे नियम लवकरच लागू करणार आहे. या नियमांची घोषणा सप्टेंबर महिन्यात करण्यात आली होती. मात्र आता हे नियम 16 डिसेंबर पासून लागू होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ट्राय यांचे असे म्हणणे आहे की, टेस्टिंग प्रोसेससाठीच खुप वेळ लागला, कारण पुढे जाऊन याबाबत कोणतीही समस्या उद्भवणार नाही. नवे नियम लागू झाल्यानंतर ग्राहकांना दुसऱ्या क्रमांकात पोर्ट करण्यासाठी फक्त 2 दिवस लागणार आहेत. युजर्सला या दोन दिवसात क्रमांक एका ऑपरेटर मधून दुसऱ्या ऑपरेटर मध्ये पोर्ट करता येणार आहे.
जर तुम्ही तुमचा क्रमांक एका सर्कल मधून दुसऱ्या सर्कल मध्ये पोर्ट करु इच्छिता तर त्यासाठी नवे नियम लागू झाल्यानंतर 5 दिवस लागणार आहेत. यापूर्वी हे नियम 11 नोव्हेंबर पासून लागू करण्यात येणार होते. मात्र आता हे नवे नियम 16 डिसेंबर पासूनच लागू होणार आहे.(5G च्या येण्याने बदलणार जग; पाहायला मिळणार 'हे' नवे बदल)