5G Mobile Network | (Photo courtesy: archived, edited, representative image)

सध्या जग इंटरनेटच्या स्पीड प्रमाणे धावताना दिसतं. प्रत्येक टेलिकॉम कंपनीमध्ये कोणाच्या नेटवर्कला किती स्पीड आहे यावर स्पर्धा सुरु असते. पण आता मात्र स्पीडच्या या विश्वात येणार आहे एक नवं युग ते म्हणजे 5G नेटवर्कचं.

2G, 3G, 4G नंतर आता सगळ्यात सुपरफास्ट म्हणून 5G ओळखलं जाणारं हे नेटवर्क लवकरच भारतात येणार असल्याची माहिती मिळत आहे. या नव्या टेक्नॉलॉजीमुळे मशिनरीचा अगदी दूरवरून वापर करता येणं शक्य होणार आहे. जसे की डॉक्टर लांब असूनही सर्जरी करू शकतील व सेल्फ ड्रायवही करता येऊ शकतं.

सध्या भारतात  4G सेवा उपलब्ध आहे. मात्र 5G च्या येण्याने मेसेज रिसिव्हरवर पोहोचेपर्यंत खूप कमी वेळ लागेल. सेल्फ ड्रायव्हिंग वाहनांमध्ये याचा वापर अचूकरीत्या होऊ शकतो. वेग कधी कमी करावा, केव्हा वाहन वळवावे आणि केव्हा ब्रेक मारावा या सर्व गोष्टी रियल टाइम मध्ये घडतील.

इतकंच नव्हे तर 5G सेवेचा AR आणि VR क्षेत्रातही चांगला उपयोग होईल, ज्यामुळे तुम्ही घरबसल्या एखादा लाईव्ह इव्हेंट VR बॉक्स वापरून अटेंड करू शकाल आणि तो ही अगदी समोर लाईव्ह दृश्य घडत आहेत असा.

Android युजर्ससाठी Google Maps घेऊन आलंय नवा शॉर्टकट, आता कमी वेळात शोधा हॉटेल्स, एटीएम, पेट्रोल पंप आणि बरंच काही

या सेवा भारतात यायला किमान पुढची 3 वर्ष लागतील कारण 5G चं जाळं बसवणं खर्चिक आहे. प्रत्येक 300 मीटर अंतरावर 5G चा रिसिव्हर असणं आवश्यक आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे 5G च्या वेव्हस जास्त अंतरापर्यंत प्रवास करू शकत नाहीत. त्या छोट्या व्हेव्स असल्यामुळे तुटण्याचा धोका असतो.