Android युजर्ससाठी Google Maps घेऊन आलंय नवा शॉर्टकट, आता कमी वेळात शोधा हॉटेल्स, एटीएम, पेट्रोल पंप आणि बरंच काही
Google Maps | (Photo Credits: File image)

स्मार्टफोनच्या आधारे ठिकाणं शोधणाऱ्या मंडळींसाठी Google मॅप एक नवा पर्याय घेऊन आले आहे. या पर्यायाच्या अधारे आपण आपले लोकेशन अगदी सोप्या आणि कमी वेळात शोधू शकता. विशेष म्हणजे हॉटेल, रेस्टॉरंट, पेट्रोल पंप, एटीएम, कार्यालयं, चौक आणि महत्त्वाची ठिकाणे शोधताना या नव्या शॉर्टकटचा (Google Maps Shortcu) उपयोग होणार आहे. गूगलने नव्याने उपलब्ध करुन दिलेला शॉर्टकट या आधी 'एक्सप्लोर टॅब'वर स्वाइप केल्यावर दिसत असे. मात्र, आता हा शॉर्टकट सर्वांसाठी सर्वकाळ उपलब्ध असणार आहे.

गूगलने Google Maps v10.28.2 नव्याने केलेला हा बदल हा अद्याप अॅण्ड्रॉईड आणि iOS युजर्ससाठी खुला झाला नाही. मात्र, गूगलने नमूद केल्याप्रमाणे 'एक्सप्लोरर टॅब'मध्ये शार्टकट दर्शवणारे हे पर्याय स्क्रिनवर आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या श्रेण्यांमध्ये आपल्या ‘होम’ किंवा ‘ऑफिस’ यासारख्या जतन केलेल्या दिशानिर्देशांचा देखील समावेश आहे. या शार्टकटचा वापर करुन आपण ‘रेस्टॉरंट्स’, ‘एटीएम’, ‘पेट्रोल पंप’, ‘शॉपिंग सेंटर’, ‘हॉटेल्स’, ‘केमिस्ट’ आणि ‘इतर’ असे अनेक पर्याय आहेत. या पर्यायांवर क्लिक करुन आपण आपल्याला आवश्यक त्या ठिकाणाचा शोध घेऊ शकता. (हेही वाचा, हॅकर्सपासून वाचण्यासाठी हे अप्स करा अपडेट, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान)

गेल्याच आठवड्यात गूगलने Android मॅपसाठी incognito mode आणला आहे. त्यानंतर गूगल आता पुन्हा एक दमदार पर्याय घेऊन युजरसमोर आला आहे.