हॅकर्सपासून वाचण्यासाठी हे अप्स करा अपडेट, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान
सोशल मिडिया (Photo Credits: PTI)

सोशल मीडिया (Social Media) वापरकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून युजर्सच्या सुरक्षिततेचा मुद्दाही उपस्थित होत आहे. फेसबुक (Facebook), इंस्टाग्रान (Instagram) यांसारख्या युजर्सचा डेटा चोरीला गेल्याच्या अनेक बातम्या आपल्या कानावर नेहमी पडत असतात. मात्र, आता हॅकिंगसारख्या घटनेला आळा घालण्यासाठी गुगलने युजर्सला नवा सल्ला दिला आहे. स्मार्टफोन किंवा लॅपटॉप अशा अनेक ठिकाणी गुगल क्रोमचा वापर केला जातो. गुगलने अशा सर्व क्रोम युजर्सला आपले ब्राउजर अपडेट करायला सांगितले आहे. ज्यामुळे कोणताही युजर्स हॅकर्सला बळी पडणार नाही.

ज्या प्रमाणे सोशल मीडिया यांसारख्या प्लॅटफार्मचा वापर केला जातो. त्याचप्रकारे हॅकिंगसारख्या घटनेत वाढ होऊ लागली आहे. हॅकर्स सहजतेने ब्राउजर मेमरीमध्ये स्टोर असलेला डेटा करप्ट किंवा मॉडिफाय करत असल्याचे समोर येत आहे. यामुळे गुगलने फेसबुक, व्हाट्सऍप आणि गुगल क्रोम युज करणाऱ्या युजर्सला क्रोम बाऊजर अपडेट करायला सांगितला आहे. महत्वाचे म्हणजे, गुगलकडून हॅकर्सपासून वाचण्यासाठी फिक्स रोलआउट करण्यात आले आहे. हे देखील वाचा- Whatsapp Privacy: जाणून घ्या आनंद तेलतुंबडे, बेला भाटिया, रवीन्द्रनाथ भल्ला, शालिनी गेडा आणि इतरांबद्दल ज्यांचे स्मार्टफोन Spyware Pegasus वापरुन करण्यात आले टॅप

गेल्या अनेक दिवसांपासून शेकडो अॅन्ड्राईड युजर्स एका नव्या मालवेअरची तक्रार करत आहेत. हा नवा मालवेअर एकदा डिलीट केल्यानंतरही पुन्हा फोनमध्ये इन्स्टॉल होत आहे. तसेच स्मार्टफोन फॅक्ट्री रिसेट केल्यानंतरही तो पुन्हा फोनमध्ये शिरत असल्याचे अनेक युजर्सने तक्रार केली होती.