टेक जायंट कंपवी मायक्रोसॉफ्ट (Microsoft) आपल्या Xbox 360 मार्केटप्लेसमधून (Xbox Marketplace) अनेक लोकप्रिय गेम काढून टाकणार आहे. एक्सबॉक्स सपोर्ट पेज वर माहिती देताना कंपनीने म्हटले की, येत्या 7 फेब्रुवारीपासून अनेक गेम टायटल आणि संबंधित ऐड-ऑन एक्सबॉक्स 360 (Add-on Xbox 360) मार्केटप्लेसमधून काढून टाकले जातील.
एकदा खरेदी केल्यावर, तुम्ही तुमच्या (एक्सबॉक्स 360) Xbox 360 डाउनलोड इतिहासातून आपण आपल्या आवश्यकतेनुसार हे गेम कधीही पुन्हा डाउनलोड करू शकता. कंपनीने आपल्या सपोर्ट पेजवर संबंधित गेम्सची यादी दिली आहे. यूजर्सच्या प्रदेशानुसार हे गेम काढून टाकले जातील.
उदाहरणच द्यायचे तर भारतात 'कॉल ऑफ ड्यूटी: अॅडव्हान्स्ड वॉरफेअर', 'काउंटर-स्ट्राइक: गो', 'असॅसिन्स क्रीड 4', 'स्टार वॉर्स बॅटलफ्रंट' आणि 'प्रिन्स ऑफ पर्शिया' यासह अनेक गेम हटवले जातील.