Microsoft (PC- Wikimedia Commons)

Microsoft Layoffs: अमेरिकन तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज मायक्रोसॉफ्ट (Microsoft) कंपनीने कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामगिरीच्या आधारे काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. कमी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मायक्रोसॉफ्टने नारळ दिला आहे. अहवालात नमूद केलेल्या टर्मिनेशन पत्रांनुसार, नोकरी गमावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय, प्रिस्क्रिप्शन आणि दंत आरोग्यसेवा फायदे तात्काळ बंद होतील. अहवालानुसार, तीन कर्मचाऱ्यांना सेव्हरन्स वेतन देखील मिळाले नाही.

यातील एका कर्मचाऱ्याला पाठवण्यात आलेल्या टर्मिनेशन पत्रात म्हटलं आहे की, 'तुमच्या नोकरीतून काढून टाकण्याचे कारण म्हणजे तुमच्या नोकरीच्या कामगिरीने किमान कामगिरीचे मानके. तसेच तुम्ही तुमच्या पदाच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. तुम्हाला तात्काळ प्रभावीपणे सर्व नोकरीच्या कर्तव्यांपासून मुक्त करण्यात येत आहे आणि मायक्रोसॉफ्ट सिस्टम, अकाउंट्स आणि इमारतींमधील तुमचा प्रवेश आजपासून काढून टाकला जाईल. तुम्हाला मायक्रोसॉफ्टच्या वतीने पुढील कोणतेही काम करायचे नाही.' (हेही वाचा -Microsoft Layoffs Coming: मायक्रोसॉफ्ट मध्ये Underperforming Employees ला मिळनार नारळ? पुन्हा नोकरकपातीची माहिती)

पत्रांमध्ये असेही म्हटले आहे की, जर व्यक्ती भविष्यात कंपनीत इतर नोकऱ्यांसाठी अर्ज करेल तर मायक्रोसॉफ्ट मागील कामगिरीचा आणि नोकरीतून काढून टाकण्याचा विचार करेल. जून 2024 च्या अखेरीस, मायक्रोसॉफ्टमध्ये अंदाजे 228000 पूर्णवेळ कर्मचारी होते. पुढील काही महिन्यांत ही संख्या कमी होऊ शकते. अहवालानुसार, मायक्रोसॉफ्टने या महिन्यात सुरक्षा, अनुभव आणि उपकरणे, विक्री आणि गेमिंगमधील नोकऱ्यांमध्येही कपात केली आहे. (हेही वाचा - Google Layoffs: गुगलमध्ये 10 टक्के नोकर कपातीची घोषणा; 'या' कर्मचाऱ्यांवर होणार परिणाम)

एआयमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक -

याआधीही कंपनीने 2023 मध्ये 10 हजार आणि 2024 मध्ये 4 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. ज्या कर्मचाऱ्यांना त्यांची कामगिरी सुधारता आली नाही त्यांना कंपनीने कामावरून काढून टाकले आहे. मायक्रोसॉफ्टच्या प्रवक्त्याने या कपातीच्या निर्णयाची पुष्टी केली आहे. काही पदे पुन्हा भरण्यात आली आहेत, असे त्यांनी सांगितले. याचा अर्थ काही विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची गरज आहे. त्याच वेळी, काही विभागांमधील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याची योजना आखण्यात आली आहे. दरम्यान, मायक्रोसॉफ्टने एआय क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. कंपनीने एआय तंत्रज्ञानात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.