Covid 19 and Face Mask | Photo Credits: Pixabay.com

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) काळातच बर्लिन येथे 3 सप्टेंबर पासून IFA 2020 सुरु होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या इवेंटमध्ये LG एक अत्यंत खास डिवाइस घेऊन येणार आहे. LG कडून इवेंटमध्ये PuriCare Wearable Air Purifier इलेक्ट्रॉनिक मास्क लॉन्च करण्यात येणार आहे. म्हणजेच या एअर प्युरीफायरला मास्क प्रमाणे चेहऱ्यावर घालता येणार आहे. साउथ कोरियाची कंपनी एलजी (LG) यांनी असे सांगितले आहे की, त्यांचा अनोखा इलेक्ट्रॉनिक मास्क पुढील आठवड्यात होणाऱ्या IFA 2020 मध्ये लॉन्च करणार आहे. या इलेक्ट्रॉनिक मास्कमध्ये दोन H13 HEPA फिल्टर्स दिले जाणार आहेत. म्हणजेच कंपनीच्या होम एअर प्युरीफायर प्रोडक्ट्स सारखीच सिस्टिम यामध्ये पहायला मिळणार आहे. ड्युअल फॅन्स आणि रेस्पायरेटरी सेंसरच्या मदतीने प्युरीफायर युजर्सला क्लीन आणि फिल्टर्ड वारा देणार आहे.

नव्या डिवाइससह युजर्सला सहजतेने स्वच्छ हवेत श्वास घेता येणार आहे. मास्कमध्ये देण्यात आलेल्या खास सेंसर युजर्सच्या श्वास घेण्याच्या वेगानुसार 3 स्पीड फॅन्सची स्पीड सेट केली जाणार आहे. कंपनीचे असे म्हणणे आहे की, युजर्सच्या चेहऱ्याला बसतील असा इलेक्ट्रिक मास्क एअर लीकेजला कमी करणार आहे. त्याचसोबत खुप तास जरी हा मास्क घातला तरीही युजर्सला कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा थकवा जाणवणार नाही आहे. (Steelbird यांनी भारतात लॉन्च केला Hands Free फेस शील्ड, पावसात सुद्धा काम करणार)

इलेक्ट्रिक मास्कमध्ये LG ने 820mAh ची बॅटरी दिली आहे. कंपनीचे असे म्हणणे आहे की, याच्या Low Performance Mode मध्ये 8 तासांचा बॅकअप मिळणार आहे. या व्यतिरिक्त हाय-परऑर्मेंस मोडमध्ये दोन तासांपर्यंतचा वापर केला जाणार आहे. कंपनी या इलेक्ट्रॉनिक प्युरीफायरसाठी खास कॅरी केस सुद्धा देणार आहे. त्याचसोबत यामध्ये UV-LED ही दिले जाणार  आहे. यामुळे धोकादायक किटाणू मारले जाऊ शकतात. मास्क हा फोनच्या अॅपला सुद्धा कंट्रोल केला जाऊ शकतो.