Steelbird यांनी भारतात लॉन्च केला Hands Free फेस शील्ड, पावसात सुद्धा काम करणार
Steelbird IGN-1 HF Face Shield (Photo Credits-Twitter)

स्टीलबर्ड (Steelbird) हेल्मेट्स यांनी नागरिकांना सध्याच्या काळात उपयोगी असे IGN-1 HF स्टेटिक फेस शील्ड लॉन्चची घोषणा केली आहे. कोविड19 च्या संकटकाळात या फेस शील्डचा नागरिकांना फायदा होणार आहे. तसेच फेस शील्डसाठी इनबिल्ड हँड्स-फ्री फंक्शन्स असणार आहेत. जे युजर्सला मोबाईल फोनचा न टच करता कॉल उचलण्याची सुविधा देणार आहे. यामुळे स्क्रिनवर कोणत्याही पद्धतीचा व्हायरस येण्याचा सुद्धा धोका नाही आहे. कारण व्यक्ती ज्यावेळी मोबाईलवर बोलतो त्यावेळी तो नाक आणि तोंडासह बोटांना सुद्धा टच करतो. मात्र या पद्धतीचा स्टीलबर्ड आयजीएन-1 एचएफ स्टेटीक फेस शील्ड कोरोना व्हायरसच्या प्रसाराची जोखीम कमी करण्यास मदत करणार आहे.

रिपोर्ट्सनुसार, मोबाईल फोन हा कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचे कारण ठरु शकते. मोबाईल फोनची स्क्रिन वारंवार सॅनिटाईज करणे शक्य नाही. त्यामुळेच स्टीलबर्ड यांनी त्यांचा अनोख्या पद्धतीचा फेस शील्ड आणला असून त्याची किंमत 1879 रुपये आहे. तर स्टीलबर्ड ग्रुपचे प्रमुख निर्देशक राजीव कपूर यांनी असे म्हटले आहे की, कोरोना व्हायरसच्या संकटकाळात आम्ही अशा एका उत्पादनाच्या बद्दल विचार केला जो नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असेल. याच कारणास्तव आम्ही आयजीएन-1 एचएफ स्टेटिक फेस शील्ड एका नव्या रुपात आणला आहे. यामध्ये नागरिकांना फेस शील्डमध्ये हँड्स फ्री सुद्धा जोडलेले दिसून येणार आहे.(ऐकावे ते नवलंच! बाजारात आला LED Face Mask, मोबाईलसारखा करू शकाल वापर; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये Video)

कंपनीचा हा फेस शील्ड बॅटरीशिवाय काम करणार आहे. त्यामुळे चार्जिंग करण्याची चिंता नाही. त्याचसोबत कोणत्याही अडथळ्याशिवाय ग्राहकांना मोबाईल मधील गाणी सुद्धा ऐकता येणार आहेत. फोन कॉल करण्यासह गुगल असिस्टंटचा सुद्धा उपयोग करता येणार आहे. सिंगल डायरेक्शनल मायक्रोफोनच्या माध्यमातून हाय क्वॉलिटी साउंडच्या फिचर्सच्या मदतीने गाणी ऐकण्याचा नवा अनुभव सुद्धा मिळणार आहे. हे फेस शील्ड सर्व मोबाईलसह कम्पेटेबल आहे. याचा उपयोग पावसाच्या काळात सुद्धा करता येणार आहे. कारण यामध्ये IP5 वॉटर रेसिस्टेंट्स हँड्स फ्री पार्टसह वॉटरप्रुफ मॅकॅनिज्म आहे.