जगातील पहिला MediaTek Dimensity 1100 प्रोसेसर स्मार्टफोन Vivo S9 5G लाँच; जाणून घ्या खास स्पेसिफिकेशन्स आणि किंमत
Vivo S9 5G (PC - Twitter)

Vivo S9 5G: विवोने आज S9 सीरिजअंतर्गत Vivo S9 5G आणि Vivo S9e 5G हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. लॉन्चबरोबरच, Vivo S9 5G नवीनतम मीडियाटेक डायमेन्सिटी 1100 प्रोसेसर असणारा जगातील पहिला स्मार्टफोन बनला आहे. त्याच वेळी, Vivo S9e 5G स्मार्टफोन मीडियाटेक डायमेंसिटी 820 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. या स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांना उत्कृष्ट कॅमेरा गुणवत्ता तसेच पावरफुल बॅटरी क्षमतेसारखी अनेक वैशिष्ट्ये मिळणार आहेत.

Vivo S9 5G किंमत -

हे दोन्ही स्मार्टफोन याक्षणी चीनमध्ये लाँच केले गेले आहेत. Vivo S9 5G च्या 8 जीबी + 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत सीएनवाय 2,999 म्हणजेच सुमारे 33,700 रुपये आहे. त्याच वेळी, सीएनवाय 3,299 म्हणजेच सुमारे 37,100 रुपयांच्या किंमतीवर 12 जीबी + 256 जीबी स्टोरेजचे व्हेरिंयट बाजारात आणण्यात आलं आहे. हा स्मार्टफोन 12 मार्चपासून अरोरा ब्लू, मिडनाइट ब्लू आणि व्हाइट कलर ऑप्शन्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. (वाचा- Realme C21: 5000mAh बॅटरीसह जबरदस्त फिचर्स असलेला रिअलमी कंपनीचा 'हा' धमाकेदार स्मार्टफोन 5 मार्चला होणार लॉन्च)

Vivo S9e 5G किंमत -

Vivo S9e 5G ची सुरुवातीची किंमत CNY 2,399 म्हणजेच सुमारे 26,900 रुपये आहे. हे मॉडेल 8GB + 128GB स्टोरेजसह देण्यात आलं आहे. 8 जीबी + 256 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत सीएनवाय 2,699 म्हणजेच सुमारे 30,300 रुपये आहे. हा स्मार्टफोन क्रिस्टल डायमंड, ओबसीडियन ब्लॅक आणि स्टेरि नाइट अरोरा कलर व्हेरिएंटमध्ये खरेदी करता येईल. हा स्मार्टफोन प्री-बुकिंगसाठी 22 मार्चपासून उपलब्ध असेल.

Vivo S9 5G चे स्पेसिफिकेशन्स -

Vivo S9 5G मध्ये 6.44 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे आणि 90Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन मीडियाटेक डायमेंसिटी 1100 प्रोसेसरवर कार्य करतो आणि त्यात 12 जीबी रॅम देण्यात आली आहे. यात ट्रिपल रीअर कॅमेरा सेटअप आहे. फोनचा प्राथमिक सेन्सर 64 एमपी आहे, तर 8 एमपी अल्ट्रा वाइड एंगल लेन्स आणि 2 एमपी मॅक्रो लेन्स देण्यात आला आहेत. ज्यामध्ये वापरकर्त्यांना पॅनोरामा, पोर्ट्रेट, नाईट सीन, स्लो मोशन, टाइम लॅप्स आणि ड्युअल व्यू व्हिडीओ अशी वैशिष्ट्ये मिळतील. सेल्फीसाठी फोनमध्ये ड्युअल फ्रंट कॅमेरा आहे. यात 44 एमपी प्राइमरी सेन्सर आणि 8 एमपी वाइड एंगल लेन्सचा समावेश आहे. पॉवर बॅकअपसाठी, त्यात 4,000 एमएएच बॅटरी असून 33 डब्ल्यू फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

Vivo S9e 5G चे स्पेसिफिकेशन्स -

Vivo S9e 5G हा स्मार्टफोन डायमेंसिटी 820 प्रोसेसरवर सादर करण्यात आला आहे. यात 90Hz रिफ्रेश रेटसह 6.44-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये ट्रिपल रीअर कॅमेरा आहे. यात 64 एमपी प्राइमरी सेन्सर आहे, तर अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि मॅक्रो लेन्सचादेखील समावेश आहे. सेल्फीसाठी वापरकर्त्यांना 32 एमपीचा फ्रंट कॅमेरा मिळेल. फोनची बॅटरी 4,100 एमएएच आहे.