Koo App कडून 'हे' खास फिचर रोलआउट, मायबोलीत ट्रान्सलेट करता येणार
Koo App (Photo Credits-File Image)

स्वदेशी Twitter म्हणून ओळख असणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Koo App ने आपल्या युजर्ससाठी खुशखबर आणली आहे.खरंतर अॅपमध्ये आता आठ भाषा रियल टाइममध्ये ट्रान्सलेट करता येणार आहेत. कु अॅपच्या नव्या फिचरच्या माध्यमातून मराठी, हिंदी, कन्नड, तमिळ, आसामी, बंगाली, तेलगु आणि इंग्रजी मध्ये ऑटोमॅटिक ट्रान्सलेट होणार आहे. या खास फिचरच्या माध्यमातून आपल्या मायबोली भाषेचा वापर केला जाणार आहे.(Amazon Great Indian Festival Sale 2021 आज मध्यरात्रीपासून प्राईम मेंबर्ससाठी खुला; जाणून घ्या काय आहेत ऑफर्स, डिस्काऊंट्स)

Koo कडून असे सांगण्यात आले आहे की, भारत असा एक देश असून तेथे अनेक भाषा बोलल्या जातात. काही कंपन्यांचे असे म्हणणे आहे की, भारतात ग्लोबल भाषा बोलली जाते पण ते चुकीचे आहे.भारतीय युजर्सला त्यांच्या मायबोली भाषेत आता या अॅपचा वापर करता येणार आहे. कंपनीने असे प्रवक्ताने म्हटले की, आम्ही खुप उत्साहित आहोत की मोठ्या स्तरावर लोकांमध्ये आपली ओळख वाढवण्यासाठी सेलेब्स याचा वापर कसा करतात. जगभरातील अन्य कोणत्याही दुसऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कडून भारतीय युजर्ससाठी असे फिचर दिले गेले नव्हते. आम्ही भारतीयांसाठी मेड इन इंडिया अॅप तयार केल्याने आनंदित आहोत.(Instagram स्टोरी मध्ये लिंक द्यायची असेल तर 'या' सोप्प्या ट्रिकचा वापर करा)

Koo App मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर सारखे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. येथे युजर्सला आपले विचार मोकळेपणे मांडता येणार आहे. तसेच दुसऱ्या युजर्सला सुद्धा एकमेकांना फॉलो करता येणार आहे. या अॅपमध्ये कॅरेक्टर लिमिट 400 ठेवण्यात आली आहे. युजर्सला मोबाइल क्रमांकाच्या माध्यमातून Koo App मध्ये Sign Up सुद्धा करु शकता. या व्यतिरिक्त दुसऱ्या मीडिया प्लॅटफॉर्मसोबत लिंक ही केले जाऊ शकते. हे अॅप iOS आणि Android युजर्ससाठी उपलब्ध आहे.