अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल (Amazon Great Indian Festival Sale) 2021 प्राइम मेंबर्ससाठी (Prime Members) आज मध्यरात्री सुरू होईल. तर इतर सर्वांसाठी हा सेल 3 ऑक्टोबर 2021 पासून खुला होईल. महिनाभर चालणाऱ्या या सेलमध्ये स्मार्टफोन (Smartphones), टॅब्लेट (Tablet), उपकरणे (Appliances) , इअरबड्स (Earbuds) आणि इतर अनेक गोष्टींवर मोठ्या प्रमाणात सूट आणि आकर्षक ऑफर मिळतील. ई-कॉमर्स कंपनीने एचडीएफसी बँक (HDFC Bank) सोबत भागीदारी केली आहे. एचडीएफसी बँकचे डेबिट/क्रेडिट कार्ड (HDFC Bank Credit & Debit Card) आणि ईएमआय (EMI) चा वापर करून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 10 टक्के सूट मिळणार आहे.
सॅमसंग गॅलेक्सी S20 FE 5G स्मार्टफोन 36,999 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. या स्मार्टफोनमध्ये प्रो-ग्रेड कॅमेरा, स्नॅपड्रॅगन 865 चिपसेट आणि 120 हर्ट्ज सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. बँक ऑफर्सचा फायदा घेऊन एचडीएफसी बँकेचे ग्राहक 33,999 रुपयांपेक्षा कमी किंमतीसाठी हा मोबाइल खरेदी करू शकतात. 50MP AI ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असलेला OnePlus Nord 2 5G हा फोन 29,999 रुपयांपासून उपलब्ध असेल.
A13 बायोनिक प्रोसेसरसह Apple iPhone 11 देखील आकर्षक ऑफर्ससह उपलब्ध असेल. अॅमेझॉनने अद्याप फोनची किंमत जाहीर केलेली नाही. रेडमी 10 प्राइम हा स्मार्टफोन Helio G88 प्रोसेसर, 90HZ डिस्प्लेसह अमेझॉनवर 11,999 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध असेल . या व्यतिरिक्त, iQOO Z3, Mi 11X 5G, Redmi Note 10 Pro, OnePlus 9 5G, Galaxy M32, iPhone XR देखील सवलतीच्या दरात उपलब्ध असतील.
Your Amazon Prime Early Access is just 24 hours away!
Still not a Prime Member?
Then Join Prime Today! #AmazonGreatIndianFestival pic.twitter.com/IMC9qcMVnm
— Amazon India (@amazonIN) September 30, 2021
Noise VS103 TWS Earbuds 899 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध होईल. Noise Air Buds+ आणि JBL Commercial CSLM20B अनुक्रमे 1,499 आणि 799 रुपयांमध्ये मिळतील . Mi Wi-Fi 1080p FHD स्मार्ट कॅमेरा 2,599 रुपयांना विकला जाईल आणि Boat वॉच फ्लॅशवरही सूट दिली जाईल. (Amazon Great Indian Festival Sale 2021 मध्ये Redmi 9A, Samsung Galaxy Note 20, Tecno Spark 7T आणि Vivo स्मार्टफोन्सवर मिळतील आकर्षक डिल्स)
अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 2021 मध्ये 10,000 रुपयांपर्यंत सूट आणि 14,000+ इलेक्ट्रॉनिक्सवर कूपन सवलत देखील प्रदान केली जाईल.