Apple (Apple / Twitter)

Jobs in iPhone Maker Apple: आयफोन (iPhone) निर्माता कंपनी ॲपल (Apple) भारतात सुमारे 400 लोकांना नोकरी देणार आहे. ॲपल बेंगळुरू, पुणे, दिल्ली-एनसीआर आणि मुंबई येथे चार नवीन स्टोअर उघडणार आहे ज्यासाठी नोकरभरती सुरू आहे. काही जॉब ओपनिंग्स कंपनीच्या वेबसाइटवर देखील दिसू लागल्या आहेत. पुढील वर्षी उघडण्यात येणाऱ्या नवीन आउटलेट्समध्ये त्यांना नियुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. यात पूर्णवेळ आणि अर्धवेळ अशा दोन्ही जागा आहेत. मुंबई आणि दिल्लीतील सध्याच्या स्टोअरसाठीही अशा अनेक रिक्त जागां आहेत. मनीकंट्रोलला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पार्ट टाइम जॉब फ्रेशर्ससाठी आहे.

सध्या, ॲपलचे भारतात दोन स्टोअर आहेत, एक बीकेसी, मुंबई आणि दुसरे सिलेक्ट सिटी वॉक, दिल्ली येथे. यामध्ये अर्धवेळ कर्मचाऱ्यांसह 90-100 कर्मचारी काम करतात आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जे नवीन स्टोअर सुरू होणार आहेत, त्या प्रत्येक स्टोअरमध्ये 90-100 कर्मचारी नियुक्त केले जातील. ॲपलने अलीकडेच दिल्ली आणि मुंबईतील त्यांच्या विद्यमान स्टोअरच्या यशानंतर किरकोळ व्यवसायाचा विस्तार करण्याची योजना जाहीर केली होती. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये हे काम सुरू करण्यात आले होते.

सूत्रांनी मनीकंट्रोलला सांगितले की, दिल्ली आणि मुंबईतील दोन स्टोअर्सनी पहिल्या वर्षी सुमारे 800 कोटी रुपयांची कमाई केली आणि कंपनीचे टॉप परफॉर्मिंग रिटेल स्टोअर बनले. सूत्रांनी सांगितले की, सुमारे 60 टक्के विक्री दिल्लीतील स्टोअरमधून होते. ॲपलची उत्पादने ऑनलाइन माध्यमातूनही विकली जातात. मात्र, भौतिक स्टोअरचे काम हे ऑफलाइन माध्यमातून विक्री वाढवणे आणि अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करणे हे आहे. आता कंपनी यावर लक्ष्य केंद्रित करत आहे. (हेही वाचा: Wipro Hybrid Work Policy: विप्रोने कर्मचाऱ्यांसाठी सादर केली नवीन हायब्रीड वर्क पॉलिसी; तीन दिवस कार्यालयातून काम करणे अनिवार्य)

कंपनीच्या स्टोअरमध्ये 20 पेक्षा जास्त भाषा बोलणारे कर्मचारी आहेत. येथे, ग्राहक 'टूडे ऍट ऍपल' सत्रांद्वारे ऍपल इकोसिस्टमशी जोडलेले आहेत. दरम्यान, ॲपलने अधिकृतपणे भारतात गेल्या महिन्यात 9 सप्टेंबर रोजी लॉन्च केलेल्या आयफोन 16 सिरीजची संपूर्ण लाइनअप एकत्र करणे सुरू केले आहे. ही पहिलीच वेळ आहे की ॲपल चीनच्या बाहेर प्रो मॉडेल्सची निर्मिती करत आहे. आयफोन 15 प्रो आणि प्रो मॅक्स हे भारतात एकत्र केल्यानंतर निवडक देशांमध्ये निर्यात केले जातील.