JioBharat V3 and V4 Launched in India: मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपल्या ग्राहकांना दिवाळी भेट दिली आहे. रिलायन्स जिओने इंडिया मोबाईल काँग्रेस (IMC) 2024 मध्ये 2 नवीन 4G फीचर फोन लॉन्च केले आहेत. लाँच केलेले दोन्ही 4G फीचर फोन जिओभारत (JioBharat) सीरीज अंतर्गत लॉन्च करण्यात आले आहेत. जिओभारत V3 आणि V4 अशी या दोन फीचर फोनची नावे आहेत. गेल्या वर्षी जिओने जिओभारत सीरीजचा V2 फोन लॉन्च केला होता, जो लोकांना खूप आवडला होता. या फोनने भारतीय फीचर फोन मार्केटमध्ये खळबळ उडवून दिली आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, जिओभारत फीचर फोनद्वारे लाखो 2G ग्राहक 4G कडे वळले आहेत. आता जिओभारत V3 आणि V4 फीचर फोन देखील बाजारात प्रचंड खळबळ माजवतील अशी अपेक्षा आहे. जिओभारत सिरीज V3, V4 4G फीचर फोनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, या फोनची किंमत 1099 रुपयांपासून सुरू होते. अशा परिस्थितीत लोकांना हा फोन खूपच स्वस्त मिळेल. जिओचे हे जिओभारत V3 आणि V4 फोन लवकरच ग्राहकांना मोबाईल स्टोअर्स तसेच जिओमार्ट आणि ऍमेझॉनवर उपलब्ध करून दिले जातील. (हेही वाचा: Google Play Store Redesign Update: गूगल प्ले स्टोर होणार अधिक अपडेट; सुलभ ॲप इंस्टॉलेशनसाठी लेआउटमध्ये पर्सिस्टंट इंस्टॉल बटणासह अनेक सुधारणा)
जिओभारत V3 आणि V4 फोन नवीनतम डिझाइनसह येतात. या फोन्समध्ये तुम्हाला 1000 mAh बॅटरी, 128 GB पर्यंत वाढवता येणारे स्टोरेज मिळेल. या फोनमध्ये तुम्ही 23 भारतीय भाषा वापरू शकता. तसेच, जिओभारत फोनमध्ये केवळ 123 रुपयांचे मासिक रिचार्ज केले जाऊ शकते, ज्यामध्ये तुम्हाला अमर्यादित व्हॉईस कॉल आणि 14 जीबी डेटाची सुविधा मिळेल. जिओच्या या फोनमध्ये आधीपासून Jio-TV, Jio-Cinema, Jio-Pay आणि Jio-Chat सारखे ॲप प्रीलोड केलेले आहेत.
याव्यतिरिक्त, तुम्ही या फोनमध्ये 455 हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल पाहू शकता. याशिवाय, फोनमध्ये तुम्हाला जिओ-पे इझी पेमेंट आणि जिओ-चॅट अमर्यादित व्हॉइस मेसेजिंग, फोटो शेअर आणि ग्रुप चॅटचे अनेक पर्याय पाहायला मिळतील. म्हणजे युजर्सना ऑनलाइन पेमेंटसाठी महागडे फोन खरेदी करण्याची गरज भासणार नाही.