Satellite EOS-08 Launch (फोटो सौजन्य - PIB)

ISRO Launches Earth Observation Satellite EOS-08: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (इस्रो) आज आणखी एक मोठे यश मिळाले आहे. पृथ्वी निरीक्षण उपग्रह-8 (EOS-08) श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून SSLV-D3 वरून प्रक्षेपित करण्यात आला. यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोने सांगितले की, SSLV-D3 रॉकेटच्या मदतीने EOS-08 उपग्रह यशस्वीपणे कक्षेत ठेवण्यात आला आहे. SSLV च्या इतर मोहिमांप्रमाणे, आजचे प्रक्षेपण हे एक मिशन आहे. या उपग्रहाचे प्रक्षेपण करताना कोणतीही चूक झाली नाही.

जानेवारीमध्ये PSLV-C58/XpoSat आणि फेब्रुवारीमध्ये GSLV-F14/INSAT-3DS मोहिमांच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर बेंगळुरू-मुख्यालय असलेल्या अंतराळ संस्थेसाठी आजचे 2024 मधील तिसरे मिशन आहे. ISRO ने सांगितले की SSLV-D3-EOS08 मिशन - प्रक्षेपण करण्यापूर्वी साडेसहा तासांचे काउंटडाउन IST 02.47 वाजता सुरू झाला होता. (हेही वाचा -ISRO Scientists Visit Tirupati Balaji Temple: SSLV D3 प्रक्षेपणाच्या आधी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी दिली तिरुपती बालाजी मंदिराला भेट (Watch Video))

पहा व्हिडिओ -

सकाळी 9.19 वाजता करण्यात आले EOS-08 प्रक्षेपण -

EOS-08 चे प्रक्षेपण 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.17 वाजता नियोजित होते. परंतु, नंतर ते येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या पहिल्या प्रक्षेपण पॅडवरून 16 ऑगस्ट रोजी सकाळी 9.19 वाजता प्रक्षेपित करण्यात आले. (हेही वाचा -1994 ISRO Spying Case: इस्रो हेरगिरी प्रकरणात सीबीआयकडून 5 जणांविरोधात आरोपपत्र दाखल; माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांना अडकवण्यासाठी रचला होता कट)

ISRO ने सांगितले की SSLV-D3-EOS-08 मिशनच्या प्राथमिक उद्दिष्टांपैकी एक म्हणजे सूक्ष्म उपग्रहाची रचना आणि विकास करणे. तसेच सूक्ष्म उपग्रहांशी सुसंगत पेलोड उपकरणे तयार करणे आणि भविष्यातील कार्यरत उपग्रहांसाठी आवश्यक नवीन तंत्रज्ञानाचा समावेश करणे. आजच्या मिशनसह, ISRO ने सर्वात लहान रॉकेटचे विकासात्मक उड्डाण पूर्ण केले आहे, जे 500 किलो पर्यंत वजनाचे उपग्रह वाहून नेऊ शकते.