Instagram युजर्सने हॅकिंग पासून बचाव करण्यासाठी 'या' टीप्स जरुर लक्षात ठेवा
Instagram (Photo Credits-File Image)

जसा जसा आपल्या आयुष्यात स्मार्टफोनचा वापर आणि महत्व वाढत चालले आहे त्या नुसार फिशिंग अटॅकचे प्रमाण ही वाढले आहे. कारण फिशिंग म्हणजेच फसवणूकीचे प्रकार सध्या वाढले असून यामध्ये कोणत्याही मार्गाचा वापर करुन व्यक्तीला लूटले जाते. अशातच आता इन्स्टाग्रामवर सुद्धा लोकांची फसवणूक केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. ज्या लोकांना इन्स्टाग्रामवर DM मध्ये मेसेज आले आणि त्यांनी त्यावर क्लिक केल्यानंतर त्यांच्यासोबत फसवणूक झाली. इन्स्टाग्राम कडून अधिकृत पद्धतीने पाठवल्या जाणाऱ्या मेसेज प्रमाणे DM मधील मेसेज होते.(TikTok चा 'Thank You' नोट सह भारतातील टीमला निरोप; रिलॉन्च करण्याची व्यक्त केली आशा)

इन्स्टाग्राम हे सुद्धा सोशल मीडियातील प्रसिद्ध प्लॅटफॉर्म असून तेथे तुम्हाला फोटो, व्हिडिओ किंवा अन्य काही गोष्टी शेअर करण्याची मुभा मिळते. परंतु इन्स्टाग्रामवर काही पोस्ट करण्यापूर्वी काही गोष्टींची दक्षता घेणे आवश्यक आहे. नाहीतर तुमचे अकाउंट हॅक करण्यासह प्रोफाइलवरील फोटोंचा गैरवापर केला जाऊ शकतो. तर हॅकिंग पासून बचाव करण्यासाठी 'या' काही टीप्स जरुर लक्षात ठेवा.

-इन्स्टाग्रामवरील अकाउंटच्या सुरक्षिततेसाठी टू फॅक्टर ऑथिंटिकेशन अॅक्टिव्ह ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे जर एखाद्याला जरी तुमचा पासवर्ड माहिती असल्यास त्याने तो वापरण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्या संदर्भात नोटिफिकेशन येते.

-थर्ड पार्टी अॅप्लिकेशनला दिलेल्या एक्सेसला तुम्ही रिवोक किंवा रद्द करा. कारण तुमची लॉगिन माहिती एक्सपोज केली जाण्याची शक्यता आहे.

-ज्या लोकांवर तुमचा विश्वास नाही त्यांना कधीच पासवर्ड शेअर करु नका.(Xiaomi भारतीय बाजारात आणणार Air Charger, हवेमध्ये चार्ज होणार तुमच्या मोबाईलसह अन्य इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स)

-इन्स्टाग्रामवर कोणत्याही युजर्ससोबत डायरेक्ट कम्युनिकेशन केले जात नाही. त्यामुळे इन्स्टाग्रामकडून केले जाणारे संवाद हे ईमेलच्या माध्यमातून होतात. त्याची पुष्टी तुम्हाला सेटिंग्स>सिक्युरिटी>इंन्स्टाग्राम ईमेल्स येथे दिसून येईल.

त्यामुळे नेहमीच इन्स्टाग्राम संदर्भातील नियम आणि अटी जाणून घ्या. तसेच तुमचे अकाउंट सुरक्षित करण्यासाठी विविध ऑप्शनचा वापर करता. त्याचसोबत कोणत्याही अज्ञात व्यक्तीला तुमची खासगी माहिती शेअर करु नका.