भारत सरकारने चीनी अॅप टिकटॉक वर बंदी घातल्यावर चीनी सोशल मीडिया कंपनी बायटडान्स ने भारतातील आपला कारभार बंद करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर टिकाटॉक ने भारतातील आपल्या टीमचे आभार मानले आहेत. यासाठी त्यांनी इंस्टाग्रामवर थँक्यू नोट लिहित भारतातील टीमला अलविदा केले आहे. त्याचबरोबर त्यांनी भारतात रिलॉन्च करण्याची आशाही व्यक्त केली आहे. दरम्यान, भारत सरकारने 29 जून 2020 रोजी सुरक्षेच्या कारणावरुन टिकटॉक सह इतर चायनीज अॅप्सवर बंदी घातली होती.
इंस्टाग्रामवरील थॅंक्यू नोटमध्ये त्यांनी लिहिले की, "डियर टिकटॉक इंडिया टीम. आपले कठोर परिश्रम, वचनबद्धता, उत्साह, नवीनता, विनोद आणि टीमवर्क यामुळे आम्हाला दररोज चांगेल काम करण्यास मदत करतात. धन्यवाद. प्रत्येक परिस्थितीत आमच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल धन्यवाद. तुमची निष्ठा आणि प्रेमाने आम्हाला एक चांगले कुटुंब दिले आहे."
"आमचे लोक नेहमीच आमचे प्रेरणास्थान राहतील. एका छोट्या टीमसह आम्हाला भारतात पुन्हा टिकटॉक सुरू करण्याची संधी मिळेल आणि कोट्यावधी वापरकर्ते, कलाकार, कथाकार, शिक्षक आणि कलाकारांचे समर्थन करण्याची संधी मिळेल, अशी आशा आहे. तोपर्यंत, सर्जनशीलतेस प्रेरणा द्या आणि आपण जिथे जाल तिथे जीवन समृद्ध करा. प्रेम, टिकटॉक इंडिया."
पहा पोस्ट:
View this post on Instagram
विशेष म्हणजे देशात टिकटॉक पुन्हा सुरु करण्याची संधी मिळेल, अशी आशा कंपनीने व्यक्त केली आहे. दरम्यान, देशात टिकटॉकचे करोडो युजर्स आणि कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत. त्यामुळे टिकटॉक भारतात पुन्हा दाखल होणार की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.