सततच्या मोबाईलच्या वापरामुळे त्याची चार्जिंग लवकर संपते आणि मोबाईल चार्जिंगला (Mobile Charging) लावला की चार्जरच्या जवळ बसावे लागते वा काही विशेष काम करता येत नाही. मात्र तुमचा हाच त्रास कमी करण्यासाठी Xiaomi ने बाजारात आपला Air Charger आणला आहे. यामुळे तुम्ही आता हवेमध्ये तुमचा मोबाईल त्वरित चार्ज करु शकणार आहेत. थोडक्यात तुम्हाला आता तुमचा मोबाईल चार्जिंगसाठी त्याला चार्जिंग कॉड लावायची गरज नाही. तो हवेमध्ये Air Charger च्या मदतीने चार्ज होईल. लवकरच हे गॅजेट भारतात विक्रीसाठी उपलब्ध होईल.
शाओमी कंपनीने आणलेल्या या एअर चार्जरच्या मदतीने न केवळ मोबाईल तर स्मार्टबँड (Smart band), स्मार्टवॉच (Smartwatch) आणि अन्य वेयरेबल डिवाईस (Wearable Devices) सुद्धा चार्ज करता येतील. कंपनीने दावा केला आहे आहे या एअर चार्जरमुळे इलेक्ट्रॉनिक डिवाईस सुद्धा चार्ज होऊ शकतात.हेदेखील वाचा- खुशखबर! VI चा 499 रुपयांचा नवा प्लान समोर अन्य टेलिकॉम कंपन्यांचे प्लान्स पडतील फिके
Revolutionizing the current wireless charging methods, #MiAirCharge Technology charges your devices remotely, without cables and charging stands. Let's see it in action! #InnovationForEveryone pic.twitter.com/9bD0Awul4s
— Xiaomi (@Xiaomi) January 29, 2021
हा एअर चार्जर ऐरे आणि एंटिनासह येतो. या चार्जरमध्ये एक आयसोलेटेड चार्जिंग टॉवर सुद्धा दिला गेला आहे. ज्यात फाइव फेज इंटरफेस एंटिना दिला गेला आहे. जो तुमच्या स्मार्टफोनचे लोकेशन डिटेक्ट करेल. त्याचबरोबर फेज कंट्रोल एरे दिला गेला आहे. ज्यात 144 एंटिना वेगळा दिला गेला आहे. हा मल्टीमीटर वाइड वेवला एनर्जीमध्ये कन्वर्ट करतो. हा एअर चार्जर एक वेगळ्या Sci-Fi चार्जिंग एक्सपिरीयंस देतो.
सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे या डिवाईस चार्जिंग करताना जर मध्ये एखादी भिंत वा काही अडथळा आला तर त्यातील उत्कृष्ट टेक्नोलॉजीमुळे कोणतीही बाधा येणार नाही. हा डिवाईस म्हणजे नेक्स्ट जनरेशन टेक्नोलॉजीचा एक नमुना आहे. हे डिवाईस घरात ठेवल्यास तुमच्या घरातील स्मार्ट डिवाईज देखील चार्ज होत राहतील. शाओमीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये या एअर चार्जरमुळे तुमचा स्मार्टफोन किती वेळात चार्ज होऊ शकतो याबाबत माहिली दिलेली नाही.