रिलायन्स जिओची भारतीय बाजारातील एन्ट्रीमुळे अन्य टेलिकॉम कंपन्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. त्यामुळे Airtel, VI ने देखील या स्पर्धेत आपले फासे टाकत नवनवीन प्लान्स ग्राहकांसाठी आणले आहे. अधिकाधिक ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी तसेच आपले ग्राहक आपल्याशी जोडून राहण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. यात VI कंपनीने नुकत्याच एका जबरदस्त प्लानची घोषणा केली आहे. यात तुम्हाला 499 रुपयांमध्ये (Rs.499 Prepaid Plan) दर दिवसा 4GB डेटा मिळणार आहे.
हा VI चा आतापर्यंतचा सर्वात जबरदस्त प्लान आहे. या प्लानमुळे अन्य कंपन्यांना VI चांगलीच टक्कर देईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. VI च्या या 499 रुपयांच्या प्रीपेड प्लान मध्ये 56 दिवसांची वैधता मिळत आहे. त्याचबरोबर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दिवसा 100 फ्री एसएमएस,zee5 अॅप आणि वोडाफोन प्ले चे मोफत सब्सक्रिप्शन मिळत आहे. तसेच दर दिवसा तुम्हाला 4GB डेटा वापरता येणार आहे.हेदेखील वाचा- Airtel ने लॉन्च केले Safe Pay फिचर, डिजिटल पेमेंट होणार अधिक सुरक्षित
या प्रीपेड प्लानमध्ये खूपच चांगले प्लान्स दिले आहेत. त्यामुळे ग्राहकांसाठी कमी पैशात उत्कृष्ट प्लानचा लाभ घेता येईल. जिओचा देखील 444 रुपयांचा प्लान आहे. मात्र त्यात केवळ 2GB चा डेटा दरदिवसा मिळतो. तर दुसरीकडे Airtel चा देखील 449 रुपयांचा प्लान आहे. मात्र त्यातही 2GB डेटा दरदिवसा मिळतो.
याचाच अर्थ असा केवळ VI ने आपल्या ग्राहकांसाठी अन्य टेलिकॉम कंपन्यांपेक्षा डबल डेटा म्हणजेच 4GB डेटा दरदिवसा दिला आहे. त्यामुळे इंटरनेट प्रेमींसाठी हा प्लान म्हणजेच पर्वणीच असणार आहे. मात्र एअरटेल आणि रिलायन्स जिओच्या प्लान्सचा विचार केला असता एअरटेलने अन्य सुविधा वोडाफोनपेक्षा जास्त चांगल्या दिल्या आहेत.