जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पॉर्न पाहण्याची सवय आहे तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण ऑनलाईन पॉर्न पाहण्याची सवय तुम्हाला धोक्यात घालू शकते. त्यानुसार हॅकर्सकडून तुमचा कंप्युटर हॅक केला जाऊन मोठ्या चालाखीने त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला जातो. याबाबत युजर्सला सुद्धा कळून येत नाही. हॅकर्स युजर्स ज्या वेळी पॉर्न व्हिडिओ ऑनलाईन पद्धतीने पाहत असतो त्यावेळी पीसी किंवा लॅपटॉपमध्ये वायरस इन्स्टॉल करतात.
वायरस एकदा इन्स्टॉल झाला की त्याच्या वापर करत वेमकॅमच्या माध्यमातून त्याचा व्हिडिओ बनवातत. त्यामध्ये युजर पॉर्न पाहत असल्याचे रिकॉर्डिंग केले जाते. यावर हॅकर्स त्यांना एक इमेल पाठवत पैशांची मागणी करतात. एवढेच नाही तर पैसे न दिल्यास त्यांना पॉर्न व्हिडिओ पाहत असल्याचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल करु अशी धमकी सुद्धा देतात. सायबर क्राइममध्ये याला सेक्सटॉर्शन असे संबोधले जाते. हॅकर्स युजर्सच्या इनबॉक्समध्ये सेक्सटॉर्सन ईमेल पाठवतात. त्यामध्ये युजर्सला जबरदस्त घाबरवत त्यांच्याकडून पैसे उकळण्यास मजबूर करतात. त्याचसोबत युजर्सला त्यावर विश्वास बसावा म्हणून काही ऑनलाईन डिटेल्स सुद्धा दिले जातात.(मुंबई: धक्कादायक! पॉर्न व्हिडिओ पाहून भावानेच केला 6 वर्षाच्या बहिणीवर बलात्कार)
काही वर्षांपूर्वी ईमेलच्या इनबॉक्स ऐवजी स्पॅम फोल्डरमध्ये सेक्सटॉर्शन मेल पाठवले जात. मात्र बदलत्या तंत्रज्ञानामळे हॅकर्ससुद्धा हॅकिंगसाठी विविध मार्ग शोधून काढत आहेत. ब्लिपिंग कंप्युटर यांच्या रिपोर्टनुसार, सेक्सटॉर्शन स्कॅम विविध विदेशी भाषेत पाठवले जाता. त्याचसोबत हॅकर्स बिटकॉईन अॅड्रेस सुद्धा दोन विभागात विभाजन करतात. याच कारणामुळे गुगल ट्रान्सलेटर हा एकमेव इंग्रजी शब्द दिसून येतो. यावर खबरदारी म्हणून गुगल, अॅपल आणि मायक्रोसॉफ्ट अंतर्गत होणारे स्कॅम रोखण्यासाठी सिस्टिममध्ये सुधारणा करत आहेत.