मुंबई: धक्कादायक! पॉर्न व्हिडिओ पाहून भावानेच केला 6 वर्षाच्या बहिणीवर बलात्कार
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

पॉर्न व्हिडिओच्या (Porn Videos) आहारी जाऊन भावानेच 6 वर्षीय बहिणीचा बलात्कार (Rape Case) करुन तिची हत्या (Murder) केली आहे. हा धक्कादायक प्रकार मुंबई (Mumbai) येथील भिंवडी (Bhiwandi) परिसरात घडला आहे. कोणगाव पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याला बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. आरोपी हा सतत पॉर्न व्हिडिओ पाहत असून यातूनच हा धक्कादायक प्रकार घडला आहे, अशी माहिती समोर आली आहे. दिवाळीच्या दिवशी बाहेर खेळायला गेलेली पीडित घरी परतली नाही, म्हणून पालकांनी कोणगाव पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. परंतु, पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर पीडीतच्या भावानेच तिचा बलात्कार करुन हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपी हा केवळ 13 वर्षाचा असून त्याला पॉर्न व्हिडिओ पाहण्याचे व्यसन जडले होते. आरोपीचे वडील अशिक्षित असून त्यांना मोबाईलमधील जास्त माहिती नसल्यामुळे आरोपी हा सतत वडिलांचा मोबाईल घेऊन पॉर्न व्हिडिओ पाहत असे. यामुळे आरोपी हा त्याचे भान हरपवून बसला आणि त्याच्या हातातून एवढा मोठा गुन्हा घडला. दिवाळीच्या दिवशी आरोपीने पीडितला निर्जन जागेवर घेवून गेला. त्यानंतर आरोपीने पीडितेवर बलात्कार करायला सुरुवात केली. दरम्यान, पीडित ही मोठ्याने ओरडू लागल्यानंतर आरोपीने तिचा गळा आवळून तिची हत्या केली. दिवाळीच्या दिवशी घराबाहेर पडलेली मुलगी घरी परतली नसल्याने पीडिताच्या पालकांनी स्थानिक पोलिसात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. परंतु, जेव्हा पोलिसांनी याप्रकरणी अधिक चौकशी केल्यानंतर तिच्या भावानेच तिचा बलात्कार करुन हत्या केल्याचे समोर आले. या घटनेमुळे आजूबाजुच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. हे देखील वाचा- लज्जास्पद! पहिल्या पतीने आपल्या साथीदारांसह महिलेवर केला सामूहिक बलात्कार; गुप्तांगावर दिले सिगारेटचे चटके

कोणगाव पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पोलिसांनी जेव्हा पीडिताच्या नातेवाईक आणि शेजाऱ्यांशी चौकशी करत होते. तेव्हा पोलिसांना आरोपीच्याा पायावर खरचटलेले दिसले. त्यानंतर पोलिसांच्या त्याच्यावर संशय आला. पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केल्यानंतर त्यानेच आपल्या बहिणीचा बलात्कार करुन हत्या केल्याचे कबूल केले.