चीनी (China) स्मार्टफोन कंपनी Huwei ने आपले नवीन मॉडेल असलेला स्मार्टफोन Huawei Nova 4e नुकताच लॉन्च केला आहे. तर या स्मार्टफोनमध्ये 32GB कॅमेरा देण्यात आला असून Vivo V15 Pro मध्ये सुद्धा अशा पद्धतीचा कॅमेरा दिला आहे. Huawei या स्मार्टफोनमध्ये खासकरुन कॅमेऱ्यावर भर देण्यात आला आहे. ट्रिपल रियर कॅमेरा आणि क्वॉड कॅमेरासह लॉन्च होणारा हा स्मार्टफोन लेटेस्ट यंत्रणेचा आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात या कंपनीने Huawei Nova 4 स्मार्टफोन लॉन्च केला होता. जगातील हा प्रथम असा स्मार्टफोन आहे ज्यामध्ये पंचहोल किंवा पिनहोल डिस्प्लेसह लॉन्च करण्यात आला.
Huawei Nova 4e स्मार्टफोन Huawei Nova 4 सारखाच चीन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. तसेच मलेशिया येथेसुद्धा स्मार्टफोन ग्राहकांना खरेदी करण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.15 इंचाचा Full HD Pluse डिस्प्ले देण्यात आलेला आहे. फोन डिस्प्लेसाठी रिजोल्यूशन 1080x2312 पिक्सल दिला आहे. हुवाईच्या या स्मार्टफोनबाबत बोलायचे झाले तर अॅन्ड्रॉई़ड 9.0 पाइवर आधारित EMUI 9.0.1 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. फोन मेमरीसाठी दोन वेरियंट 4GB RAM/128GB आणि 6GB/128GB मध्ये उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्याचसोबत स्मार्टफोनची मेमरी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 512GB पर्यंत वाढवता येऊ शकते. या स्मार्टफोनसाठी HiSillicon Kirin 710 प्रोसेसरवर काम करते.(हेही वाचा-नव्या Realme 3 स्मार्टफोनसाठी पहिल्या सेलची आजपासून सुरुवात, ही असणार ऑफर)
हुवाई नोव्हा 4ई साठी 4GB RAM/128GB स्टोरेज असणाऱ्या स्मार्टफोनसाठी किंमत 20,700 रुपये ठेवण्यात आली आहे. त्याचसोबत 6GB/128GB स्टोरेज असणाऱ्या स्मार्टफोनसाठी ग्राहकांना 22,800 रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र भारतात हा स्मार्टफोन कधी लॉन्च केला जाईल याबद्दल अधिक माहिती कंपनीकडून देण्यात आलेली नाही.