मोबाईल फोनचा पासवर्ड किंवा पॅटर्न लॉक विसरलात? 'या' सोप्प्या स्टेप्स वापरुन करा अनलॉक
पॅटर्न लॉक ( फोटो सौजन्य - फेसबुक )

आपण आपल्या फोनमधील खासगी फोटो आणि चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी मोबाईलला पासवर्ड किंवा पॅटर्न लॉक लावतो. मात्र काही वेळेस असे होते की, आपण मोबाइलचा पासवर्ड,पिन किंवा पॅटर्न विसरल्यास ते अनलॉक करण्यासाठी सर्विंस सेंटरला भेट द्यावी लागते. तर तुम्हाला फोनचा पासवर्ड किंवा पॅटर्न विसरल्यानंतर तो अनलॉक करायचा असेल तर चिंता करु नका. कारण आम्ही तुम्हाला फोन अनलॉक करण्याबद्दल काही सोप्प्या ट्रिक्स सांगणार आहोत. त्यामुळे अवघ्या काही सेकंदात तुम्ही फोन अनलॉक करता येणार आहे.(Most Dangerous Passwords: 'हे' आहेत जगातील सर्वात धोकादायक पासवर्ड; लगेच सावध व्हा, अन्यथा तुमच्या अकाऊंटमधील सर्व पैसे होतील गायब)

फोन अनलॉक कराण्यापूर्वी काही गोष्टी जरुर लक्षात ठेवा. तसेच वारंवार फोन अनलॉक करण्याचा प्रयत्न करत असाल तर तसे करु नका. कारण वारंवार फोन अनलॉक करताना चुकीचा पासवर्ड किंवा पिन टाकत राहिल्यास काहीसे मुश्किल होईल. तर जाणून घ्या खालील सोप्प्या स्टेप्स वापरुन फोन अनलॉक करु शकता.(Twitter Blue Tick: ट्विटर ने 'ब्लू टिक' साठी सुरु केले अकाउंट्सचे वेरिफिकेशन)

-प्रथम अॅन्ड्रॉइड स्मार्टफोन स्विच ऑफ करा जो तुम्हाला अनलॉक करायचा आहे.

-आता एक मिनिट थांबा.

-आता Volume च्या खाली दिलेले बटण आणि पॉवर बटण एकत्रित दाबा.

-त्यानंतर फोन रिकव्हरी मोडवर जाईल. यामधील फॅक्ट्री रिसेट बटणावर क्लिक करा.

-डेटा क्लिन करण्यासाठी Wipe Cache वर टॅप करा.

-पुन्हा 1 मिनिट वाट पहा आणि त्यानंतर तुमचे डिवाइस पुन्हा स्टार्ट करा.

-आता तुमचा फोन अनलॉक होईल. मात्र तुम्ही फोनला लावण्यात आलेले लॉग-इन आयडी आणि एक्सटर्नल मोबाईल अॅप डिलिट होतील.

तर ही ट्रिक अशावेळी काम करेल जेव्हा तुमच्या मोबाइल डिवाइसमध्ये इंटरनेट सुरु असावे. जर तुमचा डेटा कनेक्शन ऑन असेल तर तुम्हाला सोप्प्या पद्धतीने डिवाइस अनलॉक करता येऊ शकतो.

पॅटर्न लॉक अनलॉक करण्यासाठी तुम्ही आता स्मार्टफोन घ्या आणि त्यामध्ये 5 वेळा चुकीचा पॅटर्न लॉक ड्रॉ करा. तुम्हाला एक नोटिफिकेशन दाखवला जाईल. त्यामध्ये 30 सेकंदानंतर ट्राय करा असे लिहिलेले दिसेल. आता तुम्हाला फॉरगेट पासवर्डचा ऑप्शन उपलब्ध होईल.  त्यात तुमचा जीमेल आयडी आणि पासवर्ड टाका. जो तुम्ही तुमच्या लॉक डिवाइसमध्ये टाकला होता. आता तुमचा फोन अनलॉक होईल. आता नवा पॅटर्न लॉक सेट करु शकता.