WhatsApp चॅट्स iPhone मधून Samsung फोनमध्ये कसे ट्रान्सफर कराल? जाणून घ्या iOS मधून Android Mobiles मध्ये बॅकअप घेण्याची पद्धत
WhatsApp Representation Image (Photo Credits: Pixabay)

बॅकअप चॅट (Backup Chats) फिचर्सच्या घोषणेच्या काही महिन्यांनंतर लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप (WhatsApp) ने युजर्ससाठी हे फिचर सुरु केले आहे. युजर्सना त्यांच्या आयओएस (iOS) आणि अँड्रॉइड Android) फोन दरम्यान बॅकअप चॅट ट्रान्सफर करून घेता येणार आहे. परंतु, सध्या हे फिचर फक्त सॅमसंग (Samsung) अँड्रॉइड युजर्ससाठीच उपलब्ध आहे. (WhatsApp ने New Information Technology Rules 2021 अंतर्गत 16 जून ते 31 जुलै दरम्यान बॅन केली 30 लाख अकाऊंट्स)

Mashable India ने दिलेल्या माहितीनुसार, हे नवे फिचर फक्त सॅमसंगसाठी उपलब्ध असून लवकरच हे फिचर सुरु होणार असल्याचे व्हॉट्सअॅपने सांगितले आहे. परंतु, आयओएस आणि अॅनरॉईड मध्ये चॅट बॅकअप ट्रान्सफर इतके सोपे नसणार आहे. यासाठी युजर्संना SB-C to Lightning केबलची गरज आहे. या फोनद्वारे दोन्ही फोन कन्टेक्ट केल्यानंतर युजर्संना काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. यासाठी सॅमसंग युजर्संकडे स्मार्ट स्विच व्हर्जन 3.7.22.1 असणे आवश्यक आहे. तर आयफोन युजर्सकडे व्हॉट्सअॅप, आयओएस व्हर्जन 2.21.160.17 असणे आवश्यक आहे.

तसंच सॅमसंग मोबाईल हा अॅनरॉईड 10 किंवा त्याच्यावरील ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणे गरजेचे आहे. सॅमसंग मोबाईल युजर त्यांचा मोबाईल पहिल्यांदा सेटअप करत असतील तेव्हाच बॅकअॅप चॅट ट्रान्सफर करणे शक्य आहे किंवा सॅमसंग मोबाईल युजरला आपला मोबाईल फॅक्टरी रिसेट करुन बॅकअप चॅट ट्रान्सफर करता येईल.

बॅकअप चॅट ट्रान्सफर करण्याच्या स्टेप्स:

# दोन्ही मोबाईल SB-C to Lightning केबलने कनेक्ट करा.

# सॅमसंग फोनमध्ये स्मार्टस्विच मोड ऑन करा. त्यानंतर तुम्हाला एक पॉप-अप बॉक्स येईल.

# या पॉप-बॉक्समध्ये आयफोनचा QR कोड स्कॅन करा. यानंतर तुमची प्रोसेस सुरु होईल.

# तुमचा सॅमसंग फोन रिबूट करा. तुमच्या व्हॉट्सअॅप नंबरने व्हॉट्सअॅपमध्ये लॉग इन केल्यावर तुम्हाला आयओएस मोबाईल मधील चॅट पाहता येतील.

व्हॉट्सअॅपच्या पेमेंट इन्फोर्मेशन व्यतिरिक्त इतर सर्व माहिती तुमच्या सॅमसंग फोनमध्ये ट्रान्सफर झालेली असेल. सध्या ही प्रोसेस एकतर्फी असून फक्त आयफोनचे मेसेस चॅट आपण सॅमसंगमध्ये बॅकअप घेऊ शकतो. परंतु, अॅनरॉईडचे मेसेज बॅकअप आयफोनमध्ये घेण्याचे फिचर अद्याप लॉन्च झाले नाही.