WhatsApp | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) या लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅपने भारतामध्ये नव्या आयटी अ‍ॅक्ट (Information Technology Rules, 2021) अंतर्गत मागील 46 दिवसांत सुमारे 30 लाख अकाऊंट्सवर कारवाई केल्याचं जाहीर केले आहे. ही 16 जून ते 31 जुलै दरम्यानची कारवाई आहे. व्हॉट्सअ‍ॅप ने दिलेल्या माहितीनुसार 317 तक्रारी त्यांच्याकडे आल्या होत्या. त्यापैकी 316 रिक्वेस्ट या अकाऊंट बॅन साठी होत्या तर एकावर कारवाई करण्यात आली आहे. (नक्की वाचा: WhatsApp Privacy पॉलिसीसाठी नवे अपडेट येणार, युजर्सला मिळणार दिलासा).

व्हॉट्सॅप या सोशल मीडीया प्लॅटफॉर्मवर काही चूकीचं वर्तन शोधण्यासाठी ऑटोमॅटिक टुल आहे. दरम्यान कुणाला कोणत्या अकाऊंट बद्दल तक्रार नोंदवायची असल्यास wa@support.whatsapp.com वर ती दाखल करू शकतात. तसेच व्हॉट्सअ‍ॅप द्वाराचा अकाऊंट ब्लॉक किंवा अन्य अ‍ॅक्शनचा पर्याय देण्यात आला आहे.

भारतामध्ये करण्यात आलेल्या कारवाईमध्ये ही 95% खाती स्पॅम मेसेज करत असल्यामुळे करण्यात आली आहे. 2019 नंतर व्हॉट्सअ‍ॅपने देखील त्यांच्या यंत्रणा सुधारल्या आहेत. आता अशा तक्रारींमध्ये वाढ देखील झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ने 15 मे ते 15 जून दरम्यान पहिली कारवाई केली होती. त्यावेळेस 2 मिलियन अकाऊंट्सवर कारवाई झाली होती. गूगलने मे आणि जून महिन्यात आलेल्या तक्रारीवरून दीड लाख कंटेट हटवला असल्याचं म्हटलं आहे. त्यामध्ये 98% भाग हा कॉपीराईटचा असल्याने संबंधित कारवाई झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.