सध्या आपण स्मार्टफोन चोरी झाल्याच्या घटना ऐकतो. या स्थितीत सर्वात मोठी चिंता म्हणजे मोबाईलचा डेटा चोरीला जाण्याची असते. तसेच आपल्या मोबाईलमधला डेटा चोरी केलेल्या व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने वापरु नये याची सुद्धा मनात भीती वाटत असते. त्यामुळे जरी तुमचा फोन चोरीला गेला असेल तर या पद्धतीने तो लॉक करा. असे केल्याने तुमची प्रायव्हसी आणि मोबाईलमधील डेटा सुरक्षित राहील.
सर्वात प्रथम एखाद्या दुसऱ्या फोनवरुन ब्राऊजर मधून https://myaccount.google.com/find-your-phone-guide या संकेतस्थळावर भेट द्या. त्यानंतर गुगल अकाऊंट लॉगिन करुन तुमची माहिती तेथे द्या. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला सर्व स्मार्टफोनची लिस्ट दिसून येईल. तसेच जीमेल लॉगिनसुद्धा त्यावेळी सुरु होईल.(हेही वाचा-Group Invitation Control Feature ते Dark Mode, 'व्हॉट्सॅप'वर महिन्याभरात दिसणार ही '5' खास फीचर्स)
या लिस्ट मध्ये मुख्य गोष्ट लक्षात ठेवा की, ज्या स्मार्टफोनची तुम्ही निवड केली आहे त्याचा पासवर्ड विसरला आहात. तेथे तुम्हाला Lock Your Phone असे ऑप्शन दाखवले असेल. तिथे तुम्हाला नवीन पासवर्ड पोस्ट करायचा आहे. त्यामुळे तुमचा फोन लॉक होऊन अन्य कोणत्याही व्यक्तीला ते लॉक सुरु करता येणार नाही.त्याचसोबत जर तुम्हाला चोरी झालेल्या मोबाईलमधील डेटा डिलीट करायचा असेल तरीही याच पद्धतीने तुम्हाला ते करता येऊ शकणार आहे.