Group Invitation Control Feature ते Dark Mode, 'व्हॉट्सॅप'वर महिन्याभरात दिसणार ही '5' खास फीचर्स
व्हॉट्सअ‍ॅप (Photo Credits: Pixabay)

व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) त्यांच्या युजर्ससाठी अनेक फीचर्स अपडेट करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. मागील दहा वर्षात सुरूवातीला केवळ मेसेजिंग अ‍ॅप असलेले व्हॉट्सअ‍ॅप आता बिझनेससाठीदेखील खुलं आहे. अनेक नवनवे फीचर्स खुले करण्यात  आले आहेत. व्हॉट्सअ‍ॅपवरील कोणतेही नवे फीचर सुरूवातीला बीटा व्हर्जनवर तपासलं जातं. त्यामधील त्रुटी तपासल्या जातात. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी ते खुले करण्यात येते. लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवर युजर्ससाठी डार्क मोड (dark mode), ग्रुप इन्व्हिटेशन (group invitation), अ‍ॅडव्हान्स सर्च (advanced search) आणि इतर काही महत्त्वाची टूल्स येणार आहेत.

पुढील महिन्याभरात व्हॉट्सअ‍ॅपवर दिसू शकतात ही '5' खास फीचर्स

नवीन इमोजी -:

व्हॉट्सअ‍ॅपवर लवकरच ट्रान्सजेंडर प्राईड फ्लॅग, ट्रान्सजेंडर स्त्री आणि पुरूष यांचे सिम्बॉल अ‍ॅन्ड्रॉईडवर झळकण्याची शक्यता आहे. सध्या व्हॉट्सअ‍ॅप वेब आणि डेस्कटॉपवर या इमोजी उपलब्ध आहेत. युनिकोड कॅरेक्टर्स पेस्ट केल्यानंतरच या इमोजी व्हिजिबल आहेत.

ग्रुप इन्व्हिटेशन-:

व्हॉट्सअ‍ॅपवरील अनेक युजर्स group invitation feature ची आतुरतेने वाट पाहत आहेत. यामुळे कोणालाही ग्रुपमध्ये अ‍ॅड करताना त्यांची परवानगी घेणं बंधनकारक आहे. 'व्हॉट्सअ‍ॅप' वर Group Invitation Control Feature अधिकृतरित्या लॉन्च होण्यापूर्वीच Android Beta वर खुलं

अ‍ॅडव्हान्स सर्च-:

चॅटमधील काही गोष्टी शोधण्यासाठी व्हॉट्समध्ये अ‍ॅडव्हान्स सर्च हा पर्याय दिला जाणार आहे. याद्वारा फोटो,व्हिडिओ,जिफ्स,ऑडिओ,लिंक्स आणि डॉक्युमेंट्स शोधणं सोप्प होणार आहे. सध्या हे फीचर iOS beta वर खुलं करण्यात आलं आहे.

स्टेटस फीड-:

तुम्ही ज्या युजर्ससोबत सर्वाधिक इंटरेक्शन करता केवळ त्याच व्यक्तींना तुमचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स पाहण्याची मुभा मिळणार आहे.

डार्क मोड-:

व्हॉट्सअ‍ॅपवर लवकरच डार्क मोडचा पर्याय खुला होणार आहे. यामुळे अ‍ॅप्लिकेशनमध्ये बॅकग्राऊंड काळया रंगाची होईल आणि फोनची बॅटरी वाचवण्यात मदत होणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप त्यांच्या युजर्सच्या गरजा लक्षात घेता अनेक बदल करत असतात. लवकरच व्हॉट्सअ‍ॅप वरील हे 5 बदल अंमलात आणेल अशी आशा आहे. त्यामुळे आता नेमके हे बदल कधी प्रत्यक्षात उतरणार याची अनेक युजर्समध्ये उत्सुकता आहे.