WhatsApp stop service | (Photo credit: archived, edited, representative image)

युजर्सना अधिक सजकतेने व्हॉट्स अ‍ॅपचा वापर करता यावा, फेकन्यूजवर प्रतिबंध ठेवण्यासाठी मागील काही दिवसांपासून जाहिरातींसोबतच व्हॉट्सअ‍ॅप आता फीचर्समध्येही काही बदल करत आहे. मागील काही दिवसांपासून एखाद्या व्यक्तीला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये (WhatsApp Group) समाविष्ट करून घेण्यासाठी त्याच्या परवानगीसाठी खास फीचर दिले जाईल अशी चर्चा होती. आता हे फीचर Android Beta users साठी देण्यात आल्याची माहिती आहे. WABetaInfo च्या माहितीनुसार, सुरूवातीला हे disabled असेल. पण या फीचरमुळे कोणत्याही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये युजर्सला समाविष्ट करून घेण्यासाठी परवानगी घेतली जाईल. यासाठी तीन पातळींवर नियंत्रण असेल.

WhatsApp’s Group Invitation Control Feature (Photo Credits: WABetaInfo)

व्हॉट्सअ‍ॅपच्या Android beta update (version 2.19.55 )मध्ये तपासलं जातं आहे. यामध्ये काही तांत्रिक त्रुटींची तपासणी सुरू असल्याने सार्‍याच अ‍ॅन्ड्रॉईड युजर्सना त्याची सोय सध्याच्या टप्प्यावर मिळणार नाही. WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, हे फीचर Settings > Account > Privacy > Groups असं पाहता येईल.

व्हॉट्सअ‍ॅपच्या beta testers वर हे फीचर उपलब्ध करून देण्याबाबत अजूनही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सामान्य युजर्ससाठीदेखील हे फीचर नेमके कधी? कसे उपलब्ध करून दिले जाईल याची माहिती देण्यात आलेली नाही. आज आबालवृद्धांमध्ये लोकप्रिय असलेल्या व्हॉट्सशिवाय कित्येकांचे पानही हलत नाही. पण त्याचा वापर अधिक सकारात्मकेतेने करणं आवश्यक आहे.