तुमचा Email-Id किंवा मोबाईल क्रमांक डेटा लीक झालेल्या यादीत आहे? 'या' पद्धतीने तपासून पहा
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

भारतात डेटा लीकची (Data Leak) प्रकरणी दिवसागणिक अधिक वाढत चालली आहेत. नुकत्याच LinkdIn चा डेटा लीक झाल्याचे समोर आले होते. यामध्ये लाखो युजर्सचे ई-मेल आयडी (Email-Id) आणि फोन क्रमांक याचा समावेश होता. त्यामुळे तुम्हाला सुद्धा तुमचा डेटा लीक झाल्याची भीती वाटत असेल तर घाबरुन जाऊ नका. कारण आम्ही तुम्हाला तुमचा डेटा लीक झाला असेल तर तो कशा पद्धतीने तपासून पाहू शकता याबद्दल अधिक सांगणार आहोत.(Twitter भारतामध्ये नव्या नियमावलीचं पालन न केल्याने गमावणार Intermediary Platform चा दर्जा; सरकारी सूत्रांची माहिती)

तुमचा डेटा लीक झालाय का हे तपासून पाहण्यासाठी काही सोप्प्या स्टेप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागणार आहेत. यासाठी तुम्हाला प्रथम haveibeenpwned.com वेबसाइटला भेट द्यावी लागेल. तर जाणून घ्या याबद्दल अधिक माहिती.(फोनमधील Conatcs डिलिट झाले आहेत? 'या' सोप्प्या पद्धतीने करा रिस्टोर)

-वरील वेबसाइटला भेट दिल्यानंतर तुम्हाल एक Captcha Code येईल तो तुम्हाला एन्टर करावा लागणार आहे.

-आता एक नवा टॅब सुरु होईल आणि तेथे तुम्हाला तुमचा ईमेल आयडी किंवा मोबाईल क्रमांक द्यावा लागणार आहे.

-जर तुमचा ईमेल आयडी किंवा मोबाईल क्रमांक लीक झाला नसेल तर तुम्हाला No Pwnage Found असा मसेज मिळेल.

-मात्र Oh No-Pwned! असे लिहिलेले दिसून आल्यास समजून जा की, तुमचा मोबाईल क्रमांक किंवा ई-मेल आयडी लीक झाला आहे.

लक्षात ठेवा की, प्रत्येक अकाउंटसाठी एक वेगळा पासवर्ड ठेवा. एकच पासवर्ड सगळ्या अकाउंटसाठी ठेवल्यास तुमच्या डेटाला धोका पोहचू शकतो. यामुळे डेटा लीक होण्याची सुद्धा शक्यता अधिक असते. त्याचसोबत हॅकर्स सोप्पा पद्धतीने तुमच्या अकाउंटवर हल्ला करु शकतात. नेहमीच टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनचा वापर करा. जरी हॅकर्सकडे तुमच्या अकाउंटचा पासवर्ड गेल्यास तरीही तो एक्सेस करु शकणार नाही.