देशात स्मार्टफोन (Smartphone) वापरणाऱ्याची संख्या कोटींमध्ये आहे. अगदी टीनएजर्स (Teenagers) पासून ते म्हाताऱ्यांपर्यत सगळीचं मंडळी हल्ली स्मार्ट फोनचा (Smart Phone) विविध कामांसाठी वापर करतात. तरी आता हा वापर आता तुम्हाला सरकारी नियमांनुसार (Government Advisory) करावा लागणार असेल तर? हो ऐकून जरा विचित्र वाटलं असेल तरी हे खरं आहे. केंद्र सरकारकडून (Central Government) सायबर क्राईम (Cyber Crime) टाळण्यासाठी सुरक्षेच्या पार्श्वभुमिवर विशेष अॅडव्हायजरी (Advisory) जारी करण्यात आली आहे. तरी तुम्हाला या अॅडव्हायजरीच्या मदतीने सायबर क्राईम (Cyber Crime) पासून बचावण्यास मदत होईल.
सायबर गुन्ह्यांच्या(Cyber Crime) घटनांमध्ये वाढ होत असताना मोबाईल वापरकर्त्यांमध्ये (Mobile User) सायबर जागरूकता असणे अत्यावश्यक आहे. म्हणून भारत सरकारकडून (Indian Government) एक विशेष अॅडव्हायजरी (Advisory) जारी करण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक्स (Electronics) आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने त्यांच्या स्मार्टफोनवर अॅप्स डाउनलोड (Download) करण्याबाबत किंवा ऑनलाइन ब्राउझ (Online Browse) करण्याबाबत ही अॅडव्हायजरी (Advisory) आहे. (हे ही वाचा:- SOVA Trojan Virus: भारतात नव्या Mobile Banking Virus ची दहशत; Android Phone वरून मोबाईल बॅकिंग करताना सावध राहण्याचा CERT-In चा रिपोर्ट)
जाणून घेवूया या अॅडव्हायजरीबाबत विशेष माहिती :-
- तुमच्या मोबाईल फोनमध्ये कमीत कमी अप डाऊनलोड करा
- अॅप डाउनलोड करण्यापूर्वी नेहमी अॅप बाबत सविस्तर तपशील, फीडबॅक आणि "अतिरिक्त माहिती" जाणून घ्या
- लिमीटेड अॅपला तुमच्या फोनमधील डाटा वापरण्याबाबत परवानगी द्या
- कोणत्याही अवांछित ईमेल आणि एसएमएसमध्ये ऑफर केलेल्या हायपरलिंकवर क्लिक करताना अ-विश्वसनीय वेब साइट्स ब्राउझ करू नका
- संशयास्पद नंबर किंवा वास्तविक सेल फोन नंबर नसल्यास नंबर ब्लॉक करा
- कुठल्याही अनोळखी मेसेजमध्ये ऑफर केलेल्या हायपरलिंकवर क्लिक करु नका
- अँटीव्हायरस आणि अँटीस्पायवेअर सॉफ्टवेअर तुमच्या फोनमध्ये इंस्टॉल करा