Google तुमच्या 'या' गोष्टींवर ठेवतो करडी नजर, जाणून घ्या
Google Chrome Browser (Photo Credits-Twitter)

जर तुम्ही कोणत्याही कंपनीचा स्मार्टफोन किंवा कोणतेही गुगलचे डिव्हाईस वापक असल्यास त्यावर गुगलची करडी नजर कायम असते. गुगल त्यांच्या प्रत्येक युजर्सच्या हालचालींना ट्रॅकक करत असतो. तसेच गुगल त्यांच्या काही महत्वाच्या सर्विसेस बदलण्यासह युजर्सच्या पर्सनल गोष्टींबाबत सुद्धा माहिती ठेवतो. गुगलला तुम्ही कधी आणि कोणत्या वेबसाईटवर काय सर्च केले आहे याचा संपूर्ण डेटा त्यांच्याकडे असतो. एवढेच नाही ऑनलाईन पद्धतीने तुम्ही काय खरेदी केले याची सुद्धा माहिती गुगलकडे असते. सध्या गुगल हे प्रत्येकासाठी सर्च इंजिन झाले असून त्याचा जगभरात वापर केला जातो.

तर इंटरनेट आणि वेबवर तुम्ही जे काही सर्च करता त्याची एक नोट गुगलकडे तयार होते. असे ज्यावेळी होते जेव्हा तुम्ही गुगल क्रोममध्ये Sign In केलेले असते. त्यामध्ये संपूर्ण माहिती असून तुमच्या गुगल हिस्ट्री बाबत अधिक माहिती येथून मिळते. गुगल युजर्सच्या फोनमधून लोकेशन हिस्ट्री सुद्धा अॅक्सेस करु शकते. कारण गुगलला माहिती असते की तुम्ही कधी आणि कोणत्या तारखेला कुठे होतात. त्याचसोबत वॉइस आणि ऑडिओ अॅक्टिव्हिटी बाबत बोलायचे झाल्यास त्यावर सुद्धा गुगलची नजर असते. गुगल असिस्टंवर तुम्ही जी काही कमांड देतात ते गुगल आपल्याकडे स्टोर करुन ठेवते. तसेच गुगल असिस्टंवरील सुद्धा सर्व गोष्टी गुगल ट्रॅक करते. युट्युब बाबत ही हिच गोष्ट गुगलकडून केली जाते.(Google चं हे ऍप झालं आहे हॅक; वापरल्यास तुमचा फोनही पडू शकतो बंद) 

जर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग केली असल्यास त्याची माहिती सुद्धा गुगलकडे असते. तुमच्याकडून खरेदी केलेले एखादे तिकिट, बिल्स यांच्यासह अन्य महत्वाची गोपनिय माहिती गुगलकडे असते. मात्र याचे फायदे सुद्ध आहेत. कारण जर तुमचे विमान उशिराने धावणार असल्यास त्याची माहिती गुगलकडून दिली जाते. परंतु सध्या डेटा लीक होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.