तुमच्या स्मार्टफोनवरुन Google कडून अज्ञात क्रमांकावर पाठवले जातायत मेसेज, जाणून घ्या कारण
Google (Photo: Shutterstock)

नव्या तंत्रज्ञानामुळे सर्व कामे अगदी सहज पूर्ण होतात. मात्र या नव्या तंत्रज्ञानामुळे युजर्सच्या सिक्युरिटीचा प्रश्न उद्भवत आहे. गेल्या काही दिवसांपासून युजर्सचा डेटा चोरी आणि हॅक केला जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. यापासून वाचण्यालसाठी टेक कंपनी विविध मार्ग शोधून काढत आहे. याच दरम्यान गुगलने सुद्धा एसएमएसच्या माध्यमातून वेरिफिकेशन करत आहे.जर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये तुम्ही न पाठवलेला मेसेज दिसत असल्यास घाबरु नका. कारण हा एक गुगल वेरिफिकेशन प्रक्रियेतील एक भाग आहे. त्यामध्ये युजर्सच्या क्रमांकावर एखाद्या अज्ञात व्यक्तीला एसएमस पाठवला जातो. काही युजर्सने याबाबत तक्रारी सुद्धा केल्या आहेत. काही युजर्सला ही वेरिफिकेशन प्रक्रिया विचित्र वाटेल पण त्यांच्या सेफ्टीसाठी हे काम केले जात असल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

भारतासह अमेरिका आणि युरोर मधील काही युजर्सने सुद्धा त्यांच्या मोबाईल मधून पाठवण्यात आलेल्या सिक्रेट मेसेजच्या विरोधात तक्रारी केल्या आहेत. या मेसेज मध्ये एक कोड सह टेक्स मेसेज लिहिलेला असतो. त्यामध्ये 'Google is re-verifying the phone number of this device' असे लिहिण्यात आलेले असते. त्याचसोबत युजर्सला तेथे एक लिंक देण्यात येते. टेक्स मेसेज लोकल क्रमांकावर पाठवले जातात. मात्र याची खासियत अशी आहे की, हे क्रमांक युजर्ससाठी विविध असतात. गुगलने यावर अधिक स्पष्टीकरण देत असे म्हटले आहे की. जेव्हा तुम्ही स्मार्टफोनवर गुगल अकाउंट सेटअप करता त्यावेळी युजर्सला त्यांचा मोबाईल क्रमांक द्यावा लागतो. जर तुम्ही असे केल्यास कंपनी तो क्रमांक वेरिफाय करुन खरी व्यक्ती कोण हे शोधतो.(अबब! 12 कोटींना मिळणार सॅमसंगचा नवा टीव्ही; पाहूया या सर्वात महागड्या टीव्ही चे फीचर्स आहेत तरी काय?)

काही युदर्जने यावर त्रस्त होत अशी माहिती दिली आहे. गुगल सपोर्ट पेजवर कंपनी याबाबत तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे लिहिले आहे.  मात्र यावर तोडगा कधी निघणार हे अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असल्यास तुमच्या क्रमांकावरुन अज्ञात व्यक्तींना मेसेज पाठवले जाऊ नये तर तुम्ही गुगल अॅप्लिकेशन मध्ये दिलेला एसएमएस परमिशन हा ऑप्शन  डिसेबल करावा.