Good Morning बोलताच तुमचा स्मार्टफोन देणार बातम्या आणि हवामानाची माहिती, Google ची नवी ट्रिक
Google Assistant (Photo Credits-Twitter)

सध्या जग बदलत असून बहुतांश लोक टेक्नोसेव्हिक झाले आहेत. लोकांच्या हाताता मोबाईल दिसणार नाही असे होणारच नाही. प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये काही ना काही करताना दिसून येतो. तसेच स्मार्टफोनचा उपयोग फक्त कॉलिंग किंवा मेसेज करण्यासाठी नव्हे तर अन्य काही गोष्टींसाठी सुद्धा केला जातो. ज्याच्या माध्यमातून तुम्हाला बातम्या वाचता किंवा वातावरणाची माहिती मिळते. त्यामुळे जर आता तुम्ही सकाळी उठल्यावर मोबाईलला गुड मॉर्निंग (Good Morning) बोलल्यास तुम्हाला आजच्या दिवसातील हवामान आणि बातम्या तो सांगणार आहे. गुगलची (Google) ही ट्रिक प्रत्येक युजर्सला कामी येईल अशी अपेक्षा केली जात आहे.

अॅन्ड्रॉइड स्मार्टफोनमध्ये Google Assistant खुप सारी कामे करतो. येथे आपण आज गुगल असिस्टंटच्या एका फिचर बाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत. मात्र त्यासाठी तुमच्या स्मार्टफोनमध्ये गुगल असिस्टंट सुरु असणे आवश्यक आहे. परंतु जर ते सुरु नसल्यास फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन तेथे गुगल असिस्टंट सर्च करा. तेथे गेल्यावर तु्म्हाला विविध भाषा दाखवली जाईल आणि तुमच्या सोईनुसार तुम्ही त्याची निवड करा.(मदर्स डे च्या शुभेच्छा देण्यासाठी Google Doodle च्या माध्यमातून आईसाठी मनापासून बनवा अशी खास कलाकृती)

>>या पद्धतीने फिचरचा वापर करा:

-सर्वात प्रथम गुगल असिस्टंट सुरु करुन तेथे इंग्रजी भाषा निवडा.

-त्यानंतर डाव्या बाजूला देण्यात आलेल्या Explore या आयकॉनवर क्लिक करा.

-सर्च ऑप्शनमध्ये जात Manage Personal Info येथे जा.

-मॅनेज पर्सनल इन्फो येथे गेल्यावर Good Morning Routine येथे टॅप करा.

-येथे तुम्हाला अधिक ऑप्शन निवडता येणार आहे. जसे हवामानासाठी Tell me about weather ला मार्क करा.

त्यामुळे वरील दिलेल्या सोप्या स्टेप्स वापरुन तुम्हाला बातम्या आणि हवामानाची माहिती दिली जाणार आहे. तसेच तुमच्या आवडीच्या वेबासाईट्च्या न्यूज सुद्धा तुम्हाला याच्या माध्यमातून मिळवता येणार आहेत. फक्त तुम्हाला गुगल असिस्टंटला गुड मॉर्निंग बोलायचे आहे ऐवढेच तुम्ही करा आणि या फिचरचा आनंद घ्या.